शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
3
बुद्धिबळपटू तनिषा बोरामणिकरने बारावीत मिळवले १०० टक्के; पुढचे टार्गेट CA, त्यानंतर UPSC
4
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
5
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
6
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
7
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
8
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
9
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
10
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
11
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
12
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
13
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
14
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
15
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
16
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
17
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
18
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
19
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
20
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...

बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला, आत्महत्या की घातपात?; कोल्हापुरातील कंदलगाव येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 4:30 PM

तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या सिद्धीचा विहिरीत मृतदेह आढळल्याने पालकांना धक्का बसला

उद्धव गोडसेकोल्हापूर : कंदलगाव (ता. करवीर) येथून रविवारपासून (दि. ४) बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह कंदलगावातील एका विहिरीत आज, बुधवारी (दि. ७) सकाळी आढळला. सिद्धी बाळू पोवार (वय १४, सध्या रा. कंदलगाव, मूळ रा. नंद्याळ, ता. कागल) असे मृत मुलीचे नाव आहे. सिद्धी हिने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.गोकुळ शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंदलगाव येथील सिद्धी पोवार ही १४ वर्षीय मुलगी रविवारी रात्री आठच्या सुमारास घरात कोणाला काहीच न सांगता निघून गेली. मुलीचा शोध घेऊन अखेर तिच्या वडिलांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद दिली. पालक आणि पोलिसांकडून शोध सुरू असतानाच, बुधवारी सकाळी सिद्धीचा मृतदेह कंदलगावपासून जवळच असलेल्या एका विहिरीत आढळला.विहिरीत मुलीचा मृतदेह असल्याची माहिती मिळताच गोकुळ शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवून तो उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवण्यात आला. तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या सिद्धीचा विहिरीत मृतदेह आढळल्याने पालकांना धक्का बसला. दरम्यान सिद्धीने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने यांच्याकडून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस