Kolhapur: रक्तबंबाळ अवस्थेत कारमध्ये आढळला मृतदेह, कुरुंदवाड पोलिस घटनास्थळी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 13:27 IST2024-02-08T13:26:49+5:302024-02-08T13:27:08+5:30
गणपती कोळी कुरुंदवाड : येथील नांदणी भैरववाडी रस्त्यावर गॅस एजन्सीच्या गोडावून जवळ असणाऱ्या सागर कोप्पे यांच्या शेताजवळ एका चार ...

Kolhapur: रक्तबंबाळ अवस्थेत कारमध्ये आढळला मृतदेह, कुरुंदवाड पोलिस घटनास्थळी दाखल
गणपती कोळी
कुरुंदवाड : येथील नांदणी भैरववाडी रस्त्यावर गॅस एजन्सीच्या गोडावून जवळ असणाऱ्या सागर कोप्पे यांच्या शेताजवळ एका चार चाकी गाडीत अज्ञाताचा खून झाल्याची घटना घडली आहे. संतोष कदम (वय ३५ रा. सांगली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
चारचाकी वाहनात चालकाच्या बाजूच्या सीटवर संतोष कदम याचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच इचलकरंजी विभागाचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवी, कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
कुरुंदवाडच्या दिशेने कोप्पे यांच्या शेताजवळ चारचाकी गाडी थांबली होती. खूनी व्यक्ती अथवा मारेकरी यांची अद्याप माहिती मिळू शकली नाही. खूनाची घटना घडली असल्याचे समजताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली आहे. घटनास्थळी खून झाला की, इतर ठिकाणी खून करुन गाडी येथे लावण्यात आली याचा पोलीस शोध घेत आहेत. त्यासाठी पोलिसांनी गाडी नंबर, या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत असून तपासाची यंत्रणा गतिमान केली आहे.