पाचगाव येथे ५३ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST2021-07-19T04:16:32+5:302021-07-19T04:16:32+5:30

लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांनी रक्तदान शिबिराचे उद‌्घाटन केले. आमदार ...

Blood donation of 53 donors at Pachgaon | पाचगाव येथे ५३ दात्यांचे रक्तदान

पाचगाव येथे ५३ दात्यांचे रक्तदान

लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांनी रक्तदान शिबिराचे उद‌्घाटन केले.

आमदार ऋतुराज पाटील यांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन लोकमतचे कौतुक केले. ऋतुराज पाटील म्हणाले, लोकमतने राज्यभर राबवलेला रक्तदान शिबिराचा उपक्रम अत्यंत चांगला आहे. ऐन कोरोनाच्या काळात सगळीकडे रक्ताचा तुटवडा भासू लागल्याने लोकमतने उचललेले हे पाऊल ‘लोकमत रक्ताचं नातं’ या वाक्याला साजेसं आहे, यामुळे अनेकांना जीवदान मिळू शकते. उपसरपंच अश्विनी चिले, संजय पाटील,नारायण गाडगीळ तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

लोकमतचे वरिष्ठ जाहिरात प्रतिनिधी राजाराम वेताळ यांनी स्वागत केले.

१८ पाचगाव

पाचगाव येथे लोकमतच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते दात्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले. यावेळी सरपंच संग्राम पाटील व सर्व सदस्य उपस्थित हाेते.

Web Title: Blood donation of 53 donors at Pachgaon