कोल्हापूर : युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम शहरात जाणवू लागला आहे. दलालांनी या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन सिलिंडर दराचा काळाबाजार सुरू केला आहे. त्यामुळे घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या काळा बाजाराचा सुळसुळाट सुरू झाला आहे. त्यामुळे गृहिणी वैतागल्या असून व्यावसायिकांची मोठी कोंडी झाली आहे. गॅसची चढ्या दराने विक्री काही ठिकाणी सुरू आहे.घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात मोठी अडचण निर्माण झाल्याने शहरातील काही परिसरात सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी सिलिंडर वेळेत उपलब्ध होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले असून, काही ठिकाणी काळ्या बाजारात चढ्या दराने सिलिंडर विक्री होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे येत आहेत.अधिकृत दराने सिलिंडर मिळणे कठीण झाले असताना काही ठिकाणी दलालांकडून काळ्या बाजारात सिलिंडर विक्री छुप्या पद्धतीने होत आहे. घरगुती सिलिंडरसाठी ५०० ते ६०० रुपये जादा तर व्यावसायिक सिलिंडरसाठी ७०० ते ८०० रुपये अधिक आकारले जात असल्याच्या व्यावसायिकांच्या तक्रारी आहेत.
असे आहेत दरघरगुती : ९१६ रुपये (सध्याचा दर) १५०० (काळा बाजाराचा दर)व्यावसायिक : १८०० रुपये (सध्याचा दर) २५०० (काळा बाजाराचा दर)
Web Summary : Kolhapur faces cylinder shortages due to black market profiteering. Home cylinders sell for ₹1500, commercial ones for ₹2500, exploiting the crisis. Citizens and businesses are heavily impacted.
Web Summary : कोल्हापुर में कालाबाजारी के कारण सिलेंडर की कमी हो रही है। घरेलू सिलेंडर ₹1500 और व्यावसायिक सिलेंडर ₹2500 में बिक रहे हैं, जिससे संकट का फायदा उठाया जा रहा है। नागरिक और व्यवसाय बुरी तरह प्रभावित हैं।