शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘के.पी.’ना दाखविले काळे झेंडे

By admin | Updated: August 25, 2014 23:49 IST

विकासकामांबाबत केलेल्या निव्वळ घोषणांचा जाब विचारत येथील सुमारे शंभरावर तरुणांनी निषेध केला

राशिवडे : राधानगरी-भुदरगडचे आमदार के. पी. पाटील यांना विकासकामांबाबत केलेल्या निव्वळ घोषणांचा जाब विचारत येथील सुमारे शंभरावर तरुणांनी काळे झेंडे दाखवून जोरदार निषेध केला. व घोषणाबाजी केली. आमदार पाटील यांनी राशिवडेस दोन कोटींचा विकास निधी दिल्याबद्दल त्यांचा सत्कार आयोजित केला होता. कार्यक्रमास जाताना काळे झेंडे दाखविल्याने गोंधळ उडाला. सोशल मीडियावरून ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली.शिव-शाहू संघटनेच्यावतीने राष्ट्रवादीचे आमदार के. पी. पाटील यांचा सत्कार आयोजित केला होता. या कार्यक्रमास मोटारसायकल रॅलीने जात असताना तरुणांनी नामानंद चौकात आमदार पाटील यांची गाडी अडवली. यावेळी काळे झेंडे दाखवून व घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आमदार के. पी. पाटील व ‘भोगावती’चे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी निदर्शकांसमोर जाऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी निवेदन देणार आहात काय? असा प्रश्न तरुणांना विचारला असता विकास कोणाचा केला? असा प्रतिप्रश्न तरुणांनी आमदारांना केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा. किसन चौगले, धैर्यशील पाटील यांनी युवकांना शांत करीत आमदारांना गाडीत बसवून मार्गस्थ केले.दरम्यान, सत्कार समारंभात आ. के. पी. पाटील म्हणाले, काळे झेंडे दाखविल्यामुळे मी अजूनही कामे करण्यास कमी पडत असल्याचे जाणवले. यामुळे नव्याने काम करण्यास प्रेरणा मिळाली आहे. यावेळी ‘भोगावती’चे संचालक अविनाश पाटील यांनी झाल्या प्रकाराचा निषेध केला.