Maharashtra Political Crisis: भाजप कार्यकर्त्यांचा ताराराणी चाैकात जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 13:03 IST2022-06-30T13:02:41+5:302022-06-30T13:03:17+5:30
महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या सत्तासंघर्षानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत घोषणाबाजी केली.

Maharashtra Political Crisis: भाजप कार्यकर्त्यांचा ताराराणी चाैकात जल्लोष
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता असल्याने भाजपच्या वतीने बुधवारी रात्री छत्रपती ताराराणी चौकात फटाक्यांची तुफान आतषबाजी व घोषणाबाजी करत जल्लोष व्यक्त केला. यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने जल्लोषात सहभागी झाले होते.
गेले आठ दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या सत्तासंघर्षानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता असल्याने भाजपच्या वतीने कार्यकर्त्यांनी रात्री उशिरा खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्यालयासमोर तसेच ताराराणी चौकात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची तुफान आतषबाजी केली. कार्यकर्त्यांनी जल्लोष करत घोषणाबाजी केली.
यावेळी भाजपसह देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, धनंजय महाडिक, महादेवराव महाडिक यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. सुमारे तासभर सुरू असलेल्या जल्लोषामुळे चौकातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर खोळंबली होती. यावेळी माजी आमदार अमल महाडिक, सत्यजीत कदम, महापौर सुनील कदम, सुहास लटोरे, किरण नकाते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.