शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-ताराराणी आघाडी पक्की !

By admin | Updated: July 27, 2015 00:28 IST

चंद्रकांतदादा पाटील : शिवसेनेला सोबत घेण्याबाबत संदिग्धता

कोल्हापूर : महापालिकेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावून कोल्हापूर शहराचा विकासात्मक बदल करण्यासाठी भाजपने निर्धार केला असून, यासाठी उपलब्ध असणाऱ्या पर्यायांपैकी चांगला पर्याय म्हणून ताराराणी आघाडीबरोबर युती केल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेला आघाडीत सामावून घेण्याबाबत सध्या तरी विचार नसून शेवटपर्यंत काही सांगता येत नाही, असे सांगत शिवसेनेशी आघाडीबाबत त्यांनी संदिग्धता कायम राखली. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, १८ ते २० वर्षे ताराराणी आघाडीची सत्ता होती. त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न केले तर काही अपूर्ण राहिले आहेत. राज्यासह केंद्रात भाजपची सत्ता आहे. कोल्हापूर शहराचे प्रलंबित प्रश्न कायमचे निकालात काढण्यासाठी महापालिकेवर सत्ता असणे गरजेचे आहे. निवडणुकीतील विरोधकांची तयारी पाहता कोणाला तरी सोबत घेऊन एकत्रित सामोरे जाणे गरजेचे होते. आमच्यासमोर असणाऱ्या उपलब्ध पर्यायांपैकी सर्वांत चांगला पर्याय म्हणून आम्ही ताराराणी आघाडीचा निर्णय घेतला आहे. रंकाळा, पंचगंगा सुशोभीकरण व शुद्धिकरण, विमानतळ, शाहू जन्मस्थळ आदी प्रश्न आमच्या अजेंड्यावर असणार आहेत. ‘ताराराणी’ आघाडीचे नेतृत्व स्वरूप महादेवराव महाडिक करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अमल महाडिक, ‘ताराराणी’चे उपाध्यक्ष सुहास लटोरे, नगरसेवक सुभाष रामुगडे, आर. डी. पाटील, सुनील कदम, माजी नगरसेवक सुनील मोदी, महेश जाधव, संदीप देसाई, अशोक देसाई उपस्थित होते.लोकमतचाअंदाज तंतोतंतराज्यात व केंद्रात शिवसेना आमच्या सोबत आहे. प्रत्येक ठिकाणी समीकरणे वेगळी असतात, आता तरी ‘ताराराणी’ आघाडी आमच्याबरोबर आहे. शिवसेनेबाबत सध्या तरी विषय बंद झाला असून, अशा घडामोडी शेवटपर्यंत सुरू असतात. दारे बंद केलेली नाहीत, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. ताराराणी आघाडी कोणाची ?आमदार महादेवराव महाडिक यांनी २०१० मध्ये ताराराणी आघाडी विसर्जित करून ते काँग्रेससोबत राहिले. आम्ही त्यांचेच कार्यकर्ते आहोत. ताराराणी आघाडी कोणाची आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, अशी अप्रत्यक्ष कबुली सुहास लटोरे यांनी दिली.इलेक्टिव्ह मेरीटच उमेदवाराची आर्थिक ताकद बघून नव्हे, तर इलेक्टिव्ह मेरीटवरच उमेदवारी दिली जाणार आहे. असे असले तरी पोलीस दप्तरी नोंद असलेल्या एकाही गुन्हेगाराला उमेदवारी दिली जाणार नसल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.भाजप व ताराराणी आघाडी एकत्र येणार असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने २२ जुलैच्या अंकात दिले होते. ते तंतोतंत खरे ठरले.