आपसांतील मतभेद बाजूला ठेवून राजेश पाटील यांना धडा शिकवा - व्ही. बी. पाटील यांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 03:48 PM2023-08-05T15:48:49+5:302023-08-05T15:50:18+5:30

चंदगड : चंदगड तालुका पुरोगामी विचारांचा आहे. त्यामुळे आपसांतील मतभेद बाजूला ठेवून सुज्ञ व समविचारी लोकांना एकत्र करून आमदार ...

BJP Sarpanch of Kudnoor Gram Panchayat in NCP Kolhapur District | आपसांतील मतभेद बाजूला ठेवून राजेश पाटील यांना धडा शिकवा - व्ही. बी. पाटील यांचे आवाहन 

आपसांतील मतभेद बाजूला ठेवून राजेश पाटील यांना धडा शिकवा - व्ही. बी. पाटील यांचे आवाहन 

googlenewsNext

चंदगड : चंदगड तालुका पुरोगामी विचारांचा आहे. त्यामुळे आपसांतील मतभेद बाजूला ठेवून सुज्ञ व समविचारी लोकांना एकत्र करून आमदार राजेश पाटील यांना धडा शिकवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी केले.

मजरे कार्वे येथे शरद पवार समर्थक राष्ट्रवादी कार्यकत्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष शिवाजी सावंत होते. माजी महापौर आर. के. पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पाटील पुढे म्हणाले की, आमदार राजेश पाटील यांना विधानसभेचे तिकीट देताना मोठा विरोध झाला. आपण त्यांना तिकीट मिळवून दिले होते. त्याचा त्यांना विसर पडला आहे. 

यावेळी शिवानंद माळी, बी. डी. पाटील, अनिल घाटगे, शिवाजी खोत, विजय पाटील यांचीही भाषणे झाली. यावेळी शिवप्रसाद तेली, विष्णू तरवाळ, अशोक चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. गोपाळ ओऊळकर यांनी प्रास्ताविक केले. एम. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. भैरू खांडेकर यांनी आभार मानले. 

भाजपच्या सरपंच राष्ट्रवादीत

कुदनूर येथील भाजपच्या सरपंच संगीता घाटगे व त्यांचे पती उद्योजक सुरेश घाटगे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

भाजपला धक्का, तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीत केले होते सत्तांतर 

विकासाची ब्लू प्रिंट तयार करून गावचा चेहरा मोहरा बदलण्याचा मानस घेऊन तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये सत्तारूढ गटाला हादरा देत उद्योजक सुरेश घाटगे यांनी एकहाती सत्ता मिळवत आपल्या पत्नीला सरपंचपदी विराजमान केले होते. उद्योजक घाटगे यांनी सहा महिन्यांपूर्वी भाजपच्या झेंड्याखाली पॅनल बनवून सत्तारूढ कोकितकर गटाला धोबीपछाड दिला होता. त्यावेळी त्यांनी प्रथमच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हायटेक प्रचार यंत्रणा राबवली. मतदारांनीही त्यांना कौल देत एकहाती सत्ता सोपवली. उद्योजक घाटगे यांनी अवघ्या सहा महिन्यात भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केल्याने तालुक्याच्या राजकारणाला पुन्हा एकदा नवे वळण लागले आहे.

चड्डीवाल्यात मोठी ताकद 

चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनता शरद पवारांच्या विचाराने चालणारी आहे. लाल मातीतील चड्डीवाल्या माणसांत मोठी ताकद आहे. म्हणूनच या मतदारसंघात आजपर्यंत राष्ट्रवादीचाच आमदार आहे, असे गडहिंग्लजचे माजी सभापती अमर चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: BJP Sarpanch of Kudnoor Gram Panchayat in NCP Kolhapur District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.