MP Dhananjay Mahadik: खासदार धनंजय महाडिकांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 13:13 IST2022-12-12T13:09:10+5:302022-12-12T13:13:05+5:30
महाडिक हे सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात

MP Dhananjay Mahadik: खासदार धनंजय महाडिकांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक
कोल्हापूर: भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात आले आहे. याबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी स्वत: दुजोरा दिला आहे. काल, रविवारी (दि.११) हा प्रकार समोर आला. महाडिक हे सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. ते आपल्या कुटुंबासोबतचेही फोटो शेअर करत असतात.
दरम्यान, अकाउंट हॅक केल्याचे लक्षात येताच ते रिकव्हर करण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अकाउंट हॅक करण्यात आल्यानंतर धनंजय महाडिक यांचा बायोमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे महाडिक यांची कोणतीही माहिती यामध्ये दिसत नाही.