शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Election 2026: भाजपच्या १२ बंडखोरांची डोकेदुखी कायम; प्रभाग अन् कोणता झेंडा घेतला हाती.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 18:52 IST

तासाभारात कमळ सोडले, हात घेतला हातात

कोल्हापूर : शिस्तबद्ध पक्ष म्हणून अजूनही आपली ओळख सांगणाऱ्या भाजपच्या नेत्यांना कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या १२ कार्यकर्त्यांना थांबविणे शक्य झाले नाही. उर्वरित तिघांना भाजपनेच जागांच्या तडजोडीसाठी आणि एकाच प्रभागात एकच निवडणूक चिन्ह राहावे यासाठी अन्य पक्षांत पाठविले आहे. तर ५ जणांनी जनसुराज्यचा आधार घेतला असून, ६ जण अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. तर १ उमेदवार काँग्रेसमधून लढत आहे.जनसुराज्यमध्ये गेलेले आणि उमेदवारी मिळविलेले तसेच अपक्ष रिंगणात उतरलेले बहुतांशी उमेदवार हे भाजपचे संघटनात्मक पदाधिकारी होते. त्यांनी गेल्या काही वर्षांपासून नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहिले. परंतु महायुतीच्या जागा वाटपात त्यांच्यावर गंडांतर आले आणि त्यांनी तातडीने पर्यायही शोधला. ६ ड मधून राहुल सूर्यकांत घाटगे हे मंडलचे पदाधिकारी यांनी उमेदवारी न मिळाल्याने जनसुराज्यची उमेदवारी मिळविली आहे. प्रभाग क्रमांक ८ मधून जनसुराज्यच्या उमेदवार असलेल्या ऋतुजा म्हसवेकर यांचे वडील भाजपचे पदाधिकारी होते.

वाचा : काँग्रेसमध्ये एकच बंडखोर, तरी जिवाला घोरप्रभाग क्रमांक दहामधून शिवाजी पेठ मंडलच्या पदाधिकारी सरिता नितीन हरुगले या अपक्ष म्हणून रिंगणात असून, ११ मधून संतोष सदाशिव माळी आणि याच प्रभागातून भाजपचे वीरेंद्र विलास मोहिते हेदेखील अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. प्रभाग ११ मधून भाजपचे युवा मोर्चाचे पदाधिकारी विजय सुभाष दरवान हे उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढवत आहेत. १२ ब मधून मंडल पदाधिकारी रश्मी श्रीनिवासराव साळोखे या अखिल भारतीय हिंदू महासभेतर्फे रिंगणात आहेत. 

वाचा: शिंदेसेनेकडून रस्त्याच्या कामात दहा कोटींचा ढपला, रविकिरण इंगवले यांचा आरोपभाजपचे पदाधिकारी अतुल चव्हाण यांच्या पत्नी प्रीती १२ क मधून जनसुराज्यकडून निवडणूक लढवत आहेत. मंडल पदाधिकारी असलेल्या स्वाती संतोष कदम १३ अ मधून अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. तर राजारामपुरी उत्तरच्या मंडल अध्यक्ष रविकिरण गवळी यांच्या पत्नी मधुरिमा या जनसुराज्य शक्ती पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. १४ ब मधून भाजपचे पदाधिकारी विशाल शिराळकर यांच्या पत्नी पूजा या जनसुराज्यकडून रिंगणात असून, १८ अ मधूनही स्वाती संतोष कदम या रिंगणात आहेत.तासाभारात कमळ सोडले, हात घेतला हातातगेल्या दोन वर्षांपासून महेश पाटील हे भाजपकडून महापालिका निवडणुकीत उतरण्याची तयारी करत होते. ते बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या प्रभागात महिला आरक्षण पडल्याने त्यांनी त्यादृष्टीने भाजप नेत्यांसह आपल्या पत्नीची छायाचित्रे असलेले फलकही लावले होते. परंतु त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि तातडीने काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिल्याने त्यांच्या पत्नी प्रणोती हे काँग्रेसच्या उमेदवार बनल्या.

अशीही खेळी८१ पैकी ७५ ठिकाणी काँग्रेसने हात चिन्हावर उमेदवार उभे केल्याने आणि महायुतीत तीन पक्ष असल्याने चिन्हांचा घोळ होऊ नये यासाठी पाच ते सहा प्रभागांमध्ये महायुतीनेही एक चिन्ह ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच कसबा बावडा येथील प्रभाग १ मध्ये भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांना धनुष्यबाणावर आणि जुने कार्यकर्ते रवींद्र मुतगी यांना घड्याळ चिन्हावर लढविण्यास भाजपने मान्यता दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur BJP Rebels Cause Headache Before 2026 Elections: Details Inside

Web Summary : Kolhapur BJP faces internal strife as 12 members rebel before the 2026 elections. Disgruntled over seat allocation, some joined other parties or contest independently. This internal conflict poses a challenge for the party's leadership and election strategy.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाcongressकाँग्रेस