शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

‘भाजप सरकार, चले जाव’: हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हल्लाबोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 1:11 AM

कोल्हापूर : राज्यातील एकही घटक सरकारच्या कामावर समाधानी नाही.

ठळक मुद्देराज्यावर साडेचार लाख कोटींच्या कर्जाचा बोजाशिवसेना सत्तेला चिकटून बसली असून सत्तेचा मोह सुटत नाही

कोल्हापूर :राज्यातील एकही घटक सरकारच्या कामावर समाधानी नाही. कर्जमाफीत शेतकºयांची फसवणूक केली आहे. सारे राज्य खड्ड्यात अडकले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. राज्यावर साडेचार लाख कोटींच्या कर्जाचा बोजा आहे, त्याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करत ‘भाजप सरकार चले जाव’, असा इशारा राष्टÑवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला.

निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकाºयांसह कोणीच नसल्याने मुश्रीफ संतापले. राष्टÑवादीच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हल्लाबोल’ मोर्चा काढला. दसरा चौकातून सुरू झालेल्या मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात सभेत रूपांतर झाले.

यावेळी मुश्रीफ म्हणाले, सरकारच्या धोरणाने गरीब माणूस भरडला जात असून, कर्जमाफीचा तर अक्षरश: बट्ट्याबोळ केला आहे. राज्य व केंद्र सरकार सामान्य माणसाची पिळवणूक करत असून, कर्जमाफीत काहीच हातात पडले नसल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. आश्वासनांपलीकडे या सरकारने काहीच दिले नसून, लबाड सरकारला खाली खेचण्यासाठी राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करावे, असे आवाहन माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले. उपजिल्हाधिकारी (महसूल) अरविंंद लाटकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आमदार संध्यादेवी कुपेकर, महापौर हसिना फरास, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राजेश लाटकर, आर. के. पोवार, बाबासाहेब पाटील, भैया माने, चंगेजखान पठाण, अनिल साळोखे, मधुकर जांभळे, रामराजे कुपेकर, संगीता खाडे, आदिल फरास, आदी उपस्थित होते.उद्धवजी, आता जोडे हाणाचशिवसेना सत्तेला चिकटून बसली असून सत्तेचा मोह सुटत नाही. सत्तेत राहायचे आणि राज्यभर सरकार विरोधात भूमिका घ्यायची हे आता त्यांनी बंद करावे. चांगला कारभार केला नाही तर जोडे मारू, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. आता त्यांनी जोडे मारण्याची वेळ आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.वाटलावीन कर्जमाफी!चांदेकरवाडी (ता. राधानगरी) येथील शेतकरी तानाजी खोत यांनी ‘आॅनलाईन कसली ही तर वाटलावीन कर्जमाफी’ असल्याची टीका केली.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर