शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

महाडिक वसाहतीत ‘ताराराणी’चे विरोधकांना कडवे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:41 IST

विनोद सावंत / लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू वस्तीचा महाडिक वसाहत प्रभाग क्रमांक १८ आहे. येथील ...

विनोद सावंत / लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू वस्तीचा महाडिक वसाहत प्रभाग क्रमांक १८ आहे. येथील ताराराणी आघाडीचा बालेकिल्ला भेदण्याचे आव्हान काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेसमोर आहे. ताराराणी आघाडीच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. सध्या हा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग झाला असून, अनेकांची संधी हुकली आहे. सध्या पाच ते सहा इच्छुकांची चर्चा सुरू आहे. यामधील काहींनी गाठीभेटीवर भर दिला आहे.

कोल्हापूर शहरात तावडे हॉटेलमार्गे शहरात प्रवेश केल्यानंतर जे काही पहिले प्रभाग लागतात, त्यापैकी प्रभाग क्रमांक १८ महाडिक वसाहत एक आहे. या प्रभागातून राष्ट्रवादीचे प्रकाश पाटील आणि नारायण बुधले यांनी प्रतिनिधित्व केले आहे. महापालिकेच्या गत निवडणुकीत हा प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित होता. यावेळी काँग्रेस आणि ताराराणी आघाडीमध्ये थेट सामना झाला. यामध्ये ताराराणी आघाडीच्या सीमा कदम यांनी बाजी मारली. काँग्रेसच्या शीतल देसाई यांनी ११६४ इतकी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. शिवसेना आणि राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला.

सीमा कदम या माजी महापौर शिवाजीराव कदम यांच्या स्नुषा आणि ताराराणी आघाडीचे महापालिकेतील गटनेते सत्यजित कदम यांच्या वहिनी आहेत. प्रभागात त्यांनी संपर्क चांगला ठेवला असून, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांची नेहमी धडपड असते. विरोधी आघाडीत असतानाही प्रभागाचा विकास साधता येतो, हे त्यांनी कामातून दाखवून दिले आहे. महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत हा प्रभाग नागरिकांचा मागास वर्ग झाला आहे. त्यामुळे सीमा कदम निवडणूक लढवणार नाहीत. ताराराणी आघाडीच्या उमेदवाराचा त्या प्रचार करणार आहेत. मागील निवडणुकीत कदम यांच्याविरोधात असणाऱ्या शीतल देसाई यांचे पती प्रमोद देसाई या निवडणुकीत ताराराणी आघाडीकडून इच्छुक आहेत. ते आणि त्यांच्या पत्नी शीतल यांनी या प्रभागातून आतापर्यंत चार निवडणुका लढल्या असून, तीन वेळा दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. पराभूत झाल्यानंतर खचून न जाता त्यांनी कामे सुरूच ठेवली आहेत. प्रमोद देसाई गेल्या १५ वर्षांपासून सामाजिक कामात आहेत. दत्तमंदिरचे संचालक असून, त्यांचा प्रभागात चांगला संपर्क आहे.

प्रभाग क्रमांक १९ मुक्त सैनिक वसाहत अनुसूचित महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने तेथील ताराराणी आघाडीचे विद्यमान नगरसेवक राजसिंह शेळके यांनी महाडिक वसाहत प्रभागातून निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तेही ताराराणी आघाडीकडून इच्छुक आहेत. त्यांच्यासह माजी नगरसेवक नारायण बुधले यांचे चिरंजीव सचिन बुधले यांच्या नावाची चर्चा आहे. देसाई ताराराणी आघाडीकडे गेल्याने काँग्रेस ऐनवेळी येथून माजी नगरसेवक तौफिक मुलाणी यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. त्यांच्यासह नितीन मिसाळ, दिलीप बेळगावकर किंवा राम बेळगावकर यांच्या नावाचीही चर्चा आहे.

चौकट

पाच वर्षांत झालेली विकासकामे

रुईकर कॉलनी मैदानात स्केटिंग ट्रॅक, एलईडी पोल, पाथवे

विद्या कॉलनीत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र

छत्रपती संभाजी महाराज स्मारक सुशोभीकरण

युनिक पार्क येथील चॅनेल

रुईकर कॉलनी स्वामी समर्थ मंदिर रोड काँक्रिटीकरण

घाटगे कॉलनीत ऑक्सिजन पार्क, हॉलची उभारणी

लांबोरी हॉस्पिटल परिसरातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण

प्रतिक्रिया

प्रभागाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. विरोधी पक्षात असतानाही खासदार धनंजय महाडिक, सत्यजित कदम यांच्या माध्यमातून सुमारे ६ कोटींचा निधी खेचून आणला. रुईकर कॉलनीत अनेक वर्षांपासूनची रखडलेली कामे पूर्ण केली. येथील मैदानात ३० लाखांच्या निधीतून विकासकामे केली. यामध्ये स्केटिंग ट्रॅक, एलईडी पोल, पाथवे, स्ट्रीट लाईट बसवले. अमृत योजनेतून ड्रेनेजलाइन टाकली. घाटगे कॉलनीत ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच लाखांच्या निधीतून हॉलचे काम सुरू आहे.

सीमा कदम, नगरसेविका

चौकट

शिल्लक कामे

लिशा हॉटेल ते पाटोळेवाडी रस्ता

लिशा हॉटेल ते मार्केट यार्ड मार्गावर हॉटेलची संख्या जास्त असून, पार्किंगची समस्या

पावसाळ्यात सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्यावर

बहुतांश परिसरात ड्रेनेजलाइन नसल्याचा फटका

नवीन बांधकामावेळी नाल्याची रुंदी कमी केल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर

ओपन स्पेस विकसित केलेले नाहीत.

चौकट

गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते

सीमा कदम ताराराणी आघाडी १४०५

शीतल प्रमाेद देसाई काँग्रेस ११६४

आशा सवईसर्जे राष्ट्रवादी ३२०

वैष्णवी पाटील शिवसेना २२२

फाेटो : ०४०२२०२१ कोल केएमसी महाडिक वसाहत प्रभाग

ओळी : कोल्हापुरातील महाडिक वसाहत प्रभाग क्रमांक १८ मध्ये रुईकर कॉलनी येथील मैदानात स्केटिंग ट्रॅक करण्यात आला आहे.