Kolhapur- टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार ठार, टोप-वडगाव रस्त्यावर झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 17:41 IST2023-09-11T17:39:48+5:302023-09-11T17:41:10+5:30
टेम्पो चालकाने तीस फूट फरफटत नेले

Kolhapur- टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार ठार, टोप-वडगाव रस्त्यावर झाला अपघात
सुहास जाधव
पेठवडगाव : टोप वडगाव रस्त्यावर आयशर टेम्पोखाली सापडून एक जण जागीच ठार झाला. बाजीराव भूपाल चव्हाण (वय 45 रा. शिवाजीनगर सावर्डे ता.हातकणंगले) असे मृतांचे नाव आहे. हा अपघात आज सोमवारी दुपारच्या सुमारास झाला.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, सावर्डे येथील बाजीराव चव्हाण हे शिरोली एमआयडीसीत मेनन रिंग येथे नोकरीला होता. आज कामावरून घरी परत येत असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. आयशर टेम्पोच्या डाव्या बाजूस क्लीनर बाजूस सापडून ते जागीच ठार झाले. टेम्पो चालकाने त्यांना तीस फूट फरफटत नेले. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी झाली होती. दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली.
बाजीराव यांचा मनमिळाऊ व कष्टाळू स्वभाव होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. सामाजिक कार्यात ते सक्रिय होते. त्यांच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.