शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर कोणी विनाकारण वाद घालत असेल तर सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:26 IST

कोल्हापूर : रस्त्यावर धक्का लागला, गाडीची टक्कर झाली, असा विनाकारण वाद निर्माण करून लूट करण्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. ...

कोल्हापूर : रस्त्यावर धक्का लागला, गाडीची टक्कर झाली, असा विनाकारण वाद निर्माण करून लूट करण्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. कोल्हापूर शहर परिसरातही काही घटना घडल्याची ताजी उदाहरणे आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक होत असलेल्या अशा वादाबाबत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचा तसेच अशा लूटमारीपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

प्रत्येक व्यक्तीकडून आपले सोन्याचे दागिने, मौल्यवान मोबाईल, रोकड अशा वस्तूंची विशेष काळजी घेतली जाते. मोठ्या प्रमाणात दागिने, रोकड घरात असेल, तर बाहेर जाताना घराला कुलूप लावले जाते. चोरी होऊ नये म्हणून शक्य असेल तेवढी काळजी घेण्याचा प्रयत्न होतो. परंतु अलीकडे चोरसुध्दा हुशार झाले आहेत. घरफोडी, चोरी करत बसण्यापेक्षा कमी कष्टात जाता जाता हात मारत येतो का, याचा सतत विचार करत असतात. त्यातून मग चोरांच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या समोर येऊ लागल्या आहेत.

त्यापैकीच एक रस्त्यात लुटण्याचा प्रकार होय. विशेषत: कमी गर्दीच्या ठिकाणी किंवा निर्जनस्थळी एकाद्या व्यक्तीच्या वाहनाला मुद्दाम धडक मारायची. गाडीचे नुकसान झाले म्हणून त्याच्याशी वाद घालयाचा. वाद घालता घालता समोरच्या व्यक्तीला चाकूसारख्या हत्याराचा धाक दाखवून त्याच्याकडील किमती ऐवज काढून घेऊन पलायन करायचे, अशा घटना अलीकडे घडायला लागल्या आहेत. कोल्हापुरात हे प्रमाण कमी असले, तरी अशा घटना घडू शकतात. म्हणूनच विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

कोल्हापुरात तिघा जणांची लूट -

कोल्हापुरात अलीकडील काळात अशा दोन घटनांत तिघांची लूट झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे. जानेवारी ते सप्टेंबर अशा गेल्या नऊ महिन्यांत जिल्ह्यात अशा लुटीच्या ७८ घटना घडल्या आहेत.

पहिली घटना २४ ऑगस्ट रोजी कसबा बावडा येथे घडली आहे. चारचाकी वाहनातून आलेल्या काही व्यक्तींनी स्काॅर्पिओमधून येऊन महापालिकेच्या डंपरला धडक मारून त्यांच्याशी वाद घातला. नंतर डंपर चालकासह दोघांना मारहाण करून त्यांच्याजवळील किमती ऐवज, मोबाईल लुटला होता. याप्रकरणी पोलिसांनी इंदापूरच्या पाचजणांच्या टोळीला अटक केली.

दुसरी घटना दि. ९ जुलैरोजी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात घडली आहे. सिगारेट देण्याचे आमिष दाखवून इचलकरंजीच्या प्रवाशास पंचगंगेच्या घाटावर नेऊन त्याच्याजवळील रोख रक्कम आणि दागिने लुटले गेले.

असे तुमच्याही बाबतीत घडू शकते -

‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या म्हणीप्रमाणे एक घटना घडल्यानंतर बाकीच्यांनी शहाणे होणे अपेक्षित असते. परंतु वारंवार अशा घटना घडत असताना, वृत्तपत्रातून बातम्या येत असतानासुध्दा नागरिक खबरदारी घेत नाहीत आणि मग लूटमारीला बळी पडतात. अशा घटना तुमच्याबाबतीतही घडू शकतात. निर्जनस्थळी तरी कोणी थांबविण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नये.

- काय काळजी घ्याल ?

१. आपल्याजवळील मौल्यवान वस्तूंचे विनाकारण प्रदर्शन करू नये.

२. ज्या काही वस्तू जवळ असतील त्याचा नीटपणे सांभाळ करावा.

३. अशी घटना घडलीच तर चोरांच्या गाडीचे नंबर टिपून घ्यावेत.

४. संबंधित चोरांचे चेहरे नीट न्याहाळावेत, त्याचे वर्णन करता आले पाहिजे.

५. घटना घडल्यानंतर तात्काळ नियंत्रण कक्षाला फोन करून कल्पना द्यावी.

आर. आर. पाटील, पोलीस उपअधीक्षक

करवीर विभाग, कोल्हापूर.

-कोल्हापुरात घडलेल्या घटना -

जानेवारी ते मे - ५३

जून - १०

जुलै - ७

ऑगस्ट - ८