शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

दत्त उद्योग समूहाकडून सर्वतोपरी सहकार्य : गणपतराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:45 IST

शिरोळ : जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि प्रचंड कष्टातून जिनेंद्रने हे यश मिळविले आहे. त्याच्या अंगी असणारी खेळाप्रती आवड ...

शिरोळ : जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि प्रचंड कष्टातून जिनेंद्रने हे यश मिळविले आहे. त्याच्या अंगी असणारी खेळाप्रती आवड उल्लेखनीय आहे. यापुढेही त्याने विविध देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवावे. त्यासाठी दत्त उद्योग समूह त्याच्या पाठीशी राहील, असे प्रतिपादन दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले. सुपरक्रॉस नॅशनल चॅम्पियनशिपसह अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविणाऱ्या आणि भारतातील सर्वांत लहान रायडर (खेळाडू) म्हणून ओळख निर्माण केलेल्या अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील जिनेंद्र किरण सांगावे या बारा वर्षीय खेळाडूचा दत्त उद्योग समूहाच्यावतीने सत्कार करण्यात आला. दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. २०१६ पासून जिनेंद्र रायडर म्हणून मोटारसायकल रेसिंग स्पर्धेत भाग घेत आहे. गोवा, पुणे, कोचिन, नाशिक, बेळगावी, जयपूर, बरोडा, मुंबई, बंगलोर, कोइंबतूर, श्रीलंका, आदी ठिकाणी झालेल्या वीसपेक्षा अधिक स्पर्धेत भाग घेऊन पहिल्या तीन क्रमांकामध्ये त्याने यश मिळविले आहे.

याप्रसंगी आप्पा पाटील, दामोदर सुतार, अशोकराव कोळेकर, सागर सांगावे, एम. व्ही. पाटील, महेंद्र बागे, रघुनाथ पाटील, पिंटू पाटील, प्रा. मोहन पाटील, मुसा डांगे, श्रीशैल हेगान्ना, अशोक शिंदे उपस्थित होते. दादासाहेब पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो - ०३०३२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील मोटारसायकल रायडर जिनेंद्र सांगावे यांचा दत्त उद्योग समूहाच्यावतीने सत्कार झाला. यावेळी गणपतराव पाटील, एम. व्ही. पाटील, दामोदर सुतार, महेंद्र बागे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.