अपहरणकर्त्यांच्या बेळगाव पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 06:12 PM2020-05-09T18:12:03+5:302020-05-09T18:18:48+5:30

एक श्रीमंत व्यक्तीचे पैशांच्या कारणासाठी अपहरण करणाऱ्या ९ जणांच्या बेळगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. बेळगावच्या मार्केट पोलीस स्थानकात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना कारागृहात धाडण्यात आले आहे.

Belgaum police kisses the kidnappers | अपहरणकर्त्यांच्या बेळगाव पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अपहरणकर्त्यांच्या बेळगाव पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Next
ठळक मुद्देअपहरणकर्त्यांच्या बेळगाव पोलिसांनी आवळल्या मुसक्याबेळगावच्या मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा

बेळगाव  : एक श्रीमंत व्यक्तीचे पैशांच्या कारणासाठी अपहरण करणाऱ्या ९ जणांच्या बेळगावपोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. बेळगावच्या मार्केट पोलीस स्थानकात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना कारागृहात धाडण्यात आले आहे.

भांदुरगल्ली येथील व्यक्ती मागील चार महिन्यापासून बेपत्ता होता. याबद्दल तपास करताना या व्यक्तीचे काही जणांनी अपहरण केले असल्याचे मार्केट पोलिसांच्या लक्षात आले होते. यामुळे सापळा रचुन संशयितांना जाळ्यात ओढण्यात पोलिसांना यश आले आहे.

भांदुर गल्ली येथील अण्णासाहेब चौगुले यांना कीडनॅप करून कोट्यवधी रुपये उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाद्वार रोड येथील विनायक शंकर प्रधान,न्यु गांधीनगरचा पिंटू उर्फ शिवनाथ रानबा रेडकर,फुलबाग गल्लीतील अमित यल्लप्पा मजगावी, गांधीनगरचा मुरारी बाबजन खानापुरी, हडलगे गावचा सुरेश महादेव पाटील, बेळवट्टीचा चेतन नारायण पाटील, अनगोळचा संजय प्रकाश कौजलगी,राजू ज्ञानेश्वर गोणी, अमित परशराम धमाणेकर यांना अटक करण्यात आली आहे.

त्यांच्या जवळून किडनॅप करण्यासाठी वारपलेली एक कार पाच दुचाकी व ९ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. मार्केट ए सी पी एन व्ही बरमनी व पोलीस निरीक्षक संगमेश् शिवयोगी यांनी शनिवारी दुपारी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.

बेळगाव भांदूर गल्लीचे रहिवाशी अण्णासाहेब चौगुले हे ब्रह्मचारी आहेत त्यांच्या नावे सांबरा रोडवरील पोतदार शाळेजवळ २ एकर ३४ गुंठे अशी कोट्यवधी रुपयांची जमीन आहे या शिवाय अण्णासाहेब यांच्या नावावर ३० लाखांचे डिपॉझिट आहे.

चार महिन्यापूर्वी अण्णासाहेब बेपत्ता असल्याची तक्रार मार्केट दाखल झालो होती, त्यावेळीच या अपहरणकर्त्या टोळीने त्यांचे अपहरण करून जिल्ह्यातील वेगवेगळ्या फार्म हाऊस मध्ये ठेवले होते.

शेवटी महाराष्ट्रातील गडहिंग्लज तालुक्यातील कडलगे येथे ठेवले होते. जीवाची भीती दाखवून त्यांच्या कडून लिहून घेतली होती. रजिस्टर ऑफिसला जाण्याअगोदर लॉक डाऊन सुरू होते, त्यामुळे आरोपींचे मनसुबे उधळले. लॉक डाऊन संपताच आणासाहेब बँकेमधील पैसे काढण्यासाठी बेळगावला आणल्यानंतर पोलिसांनी अपरहरणकर्त्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौगुले यांना अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येत होते. त्याच्याकडे आणि त्याच्या नातेवाईकांकडे पैश्याची मागणी करण्यात येत होती.

पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार आणि डीसीपी यशोदा यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सापळा रचला होता.लॉकडाऊनच्या काळात अपहरण करून एक व्यक्तीच्या जीवाची भीती घालून पैसे उकळण्याचा कारभार त्या ९ जणांना अंगलट आला आहे. आता त्यांना कारागृहाची हवा खावी लागणार आहे.

Web Title: Belgaum police kisses the kidnappers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.