शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘भोगावती’च्या संचालकांचे राजीनामे मागे

By admin | Updated: October 13, 2015 23:47 IST

नेत्यांची मध्यस्थी : अशोकराव पाटील, विश्वासराव पाटील यांची घोषणा

भोगावती : भोगावती सहकारी साखर कारखान्यात नोकरभरती करावी, अध्यक्ष, उपाध्यक्षांकडून कारखान्यातील कारभारात घेतले जात नाही, या प्रमुख कारणांसाठी संचालक पदाचा दिलेला राजीनामा नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर माघारी घेत आहोत, अशी घोषणा ‘भोगावती’चे माजी उपाध्यक्ष अशोकराव दिनकर पाटील आणि विश्वासराव शंकरराव (आबा) पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. विश्वास वरुटे यांच्या राजीनामा नाट्याने कारखान्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. याची दखल थेट आमदार मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार संपतराव पाटील, ए. वाय. पाटील यांना घ्यावी लागली. याबाबत अशोकराव पाटील म्हणाले, आम्ही काही कारणांसाठी राजीनामा दिला होता. याची दखल घेऊन आमदार हसन मुश्रीफ, ए. वाय. पाटील, संपतराव पाटील यांच्याबरोबर चर्चा झाली. त्यानंतर त्यांच्या आदेशाने हा राजीनामा माघारी घेतला आहे. यापुढील काळात आम्ही एकत्रित काम करून सभासदांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. उपाध्यक्ष केरबा भाऊ पाटील यांनी स्वागत केले. यावेळी अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर, संचालक रघुनाथ जाधव, नामदेव पाटील, पांडुरंग डोंगळे, बाबूराव हजारे, विश्वनाथ पाटील, अमर पाटील, संभाजी पाटील, राजू कवडे, कार्यकारी संचालक एस. एस. पाटील, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)नपाच वर्षांत मिळाले, चार दिवसांत घालविले ऊस उत्पादकांना वेळेवर बिल, काही अंशी कामगारांना पगार वेळेवर देऊन या संचालक मंडळाने पाच वर्षांत सभासदांच्या मनात स्थान मिळविले होते. ते फक्त चार दिवसांत धुळीला मिळविल्याची खंत यावेळी अशोकराव पाटील यांनी व्यक्त केली.