शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
2
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
3
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
4
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
5
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
6
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
7
Video - हृदयस्पर्शी! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नवजात बाळांना कुशीत घेऊन पळाली नर्स
8
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
9
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
10
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
11
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
12
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
13
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
14
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
15
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
16
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
17
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
18
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
19
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
20
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! शहर, जिल्ह्यातील डेंग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:28 IST

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकुनगुनिया, काविळचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका, ...

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकुनगुनिया, काविळचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका, जिल्हा रुग्णालयातील ओपीडी रुग्णांनी फुल्ल झाले आहेत. अलीकडे या रुग्णालयात पाय ठेवायलाही जागा मिळेनासी झाली आहे.

पावसामुळे अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली आहे. एडीस इजिप्ताय डासापासून डेंग्यू, चिकुनगुनिया आजार बळावतो. त्याचा फैलावही होतो. घरात आणि परिसरातील साठलेल्या पाण्यात या डासाची उत्पत्ती होते. यामुळे डेंग्यू, चिकुनगुनियाचे रूग्ण वाढत आहेत. नैसर्गिक स्रोत, प्रवाहीत पाणीही दूषित झाल्याने पिण्यासाठी स्वच्छ, शुद्ध पाण्याचा अभाव आहे. परिणामी दूषित पाण्यामुळे काविळचे रुग्ण वाढत आहेत. एकेका कुटुंबांत अनेक रुग्ण सापडत आहेत. या आजाराची गावात साथ आल्यासारखी परिस्थिती आहे. हे तिन्ही आजार किरकोळ आहेत. पण दुर्लक्ष झाल्यास जीवघेणा ठरत आहे. शहरात डेंग्यूने मृत्यू होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

१) सध्या उपचार घेत लेले रुग्ण

डेंग्यू - २६

चिकुनगुनिया - ३७

काविळ - १६

२) रोज किमान १० पेशंट

डेंग्यू, चिकुनगुनिया, कावीळचे रोज कमीत कमी ५ आणि अधिकाधिक १० रुग्ण मिळत आहेत. या आजाराने गंभीर असलेले रुग्ण रुग्णालयात दाखल होवून उपचार घेत आहेत. पहिल्या टप्प्यातील रुग्ण ओपीडीमध्ये उपचार घेवून घरी जाताना दिसतात.

३) लहान मुलांचे प्रमाण जास्त

साथीच्या आजाराला लहान मुलेही मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. डेंग्यू, काविळ या आजाराचे प्रमाणत लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळत आहे. यामुळे बालरोगतज्ज्ञांकडेही बाल रुग्णांची गर्दी होत आहे.

४) काय आहेत लक्षणे?

डेंग्यू - तीव्र ताप, तीव्र डोके दुखी, स्नायूदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, तीव्र डोळेदुखी, अशक्तपणा, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, ताप कमी व जास्त होणे, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली रक्तस्राव, नाकाकडून रक्तस्राव, रक्ताची उलटी, रक्तमिश्रित किंवा काळसर रंगाची शौचास होणे, पोट दुखणे.

चिकुनगुनिया - ताप, डोकेदुखी, मळमळ, सांधेदुखी.

कावीळ - ताप, भूक मंदावणे, मळमळणे, थकवा येणे, उलटी होणे, डोळे पिवळे दिसणे, लघवी पिवळी होणे.

५) कोट

सध्या डेंग्यू, चिकुनगुनिया रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर वेळेत उपचार होणे गरजेचे आहे. म्हणून लक्षणे जाणवता क्षणी रक्तांची तपासणी करून घेवून निदान, उपचार घ्यावेत.

डॉ. विनोद मोरे, जिल्हा हिवताप अधिकारी