कोरोना वाढतोय काळजी घ्या, गाफील राहू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:45 IST2021-02-21T04:45:06+5:302021-02-21T04:45:06+5:30

उत्तूर : कोरोनाचा राज्यात पुन्हा उद्रेक होण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे. गाफील राहू ...

Be careful Corona is growing, don’t be careless | कोरोना वाढतोय काळजी घ्या, गाफील राहू नका

कोरोना वाढतोय काळजी घ्या, गाफील राहू नका

उत्तूर : कोरोनाचा राज्यात पुन्हा उद्रेक होण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे. गाफील राहू नका, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. उत्तूर येथे छत्रपती युवा ग्रुप आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, राज्याला कोरोनाचा पुन्हा सामना करावा लागणार आहे. काही जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे. मास्कच वापर हाच मोठा उपाय आहे. त्यामुळे प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे आहे. विनामास्क कोणी फिरू नये, आपल्या आरोग्याची आपणच काळजी घेतली पाहिजे.

यावेळी युवा ग्रुपचे कार्यकर्ते, सरपंच वैशाली आपटे, वसंत धुरे, शिरीष देसाई, मारुती घोरपडे, विजय गुरव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Be careful Corona is growing, don’t be careless