स्वाती कृष्णात दाम्पत्याला बळिराजा पुरस्कार, सोमवारी वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 18:42 IST2020-11-10T18:23:11+5:302020-11-10T18:42:02+5:30

कोल्हापूर : बळिराजा महोत्सव समिती, शाहू सत्यशोधक समाज, सत्यशोधक प्रबोधन महासभा व पुरोगामी कार्यकर्ते यांच्या वतीने यंदाचे ह्यबळिराजा सन्मानह्य ...

Batiraja award to Swati Krishna couple, distribution on Monday | स्वाती कृष्णात दाम्पत्याला बळिराजा पुरस्कार, सोमवारी वितरण

स्वाती कृष्णात दाम्पत्याला बळिराजा पुरस्कार, सोमवारी वितरण

ठळक मुद्देस्वाती कृष्णात दाम्पत्याला बळिराजा पुरस्कार, सोमवारी वितरण चव्हाण, कांबळे, देसाई, कडोलकर यांचाही समावेश

कोल्हापूर : बळिराजा महोत्सव समिती, शाहू सत्यशोधक समाज, सत्यशोधक प्रबोधन महासभा व पुरोगामी कार्यकर्ते यांच्या वतीने यंदाचे ह्यबळिराजा सन्मानह्य पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती प्राचार्य टी. एस. पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

दरवर्षी बलिप्रतिपदादिनी बळिराजाचे स्मरण म्हणून, समाजातील सत्यशोधक विचारांनी समाजप्रबोधन व परिवर्तनाचे काम करणाऱ्या व्यक्तींना बळिराजा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा अनिल चव्हाण, नामदेवराव कांबळे, स्वाती कृष्णात (कोरे) व कृष्णात स्वाती (कोरे), शफिक देसाई, दमयंती कडोलकर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

बलिप्रतिपदेस, सोमवारी (दि. १६) सायंकाळी पाच वाजता शेकाप कार्यालयात ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य विश्वास सायनाकर यांच्या हस्ते व शाहू सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष बाबूराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सन्मानचिन्ह, शाल असे पुरस्काराचे स्वरूप असल्याचे प्राचार्य पाटील यांनी सांगितले. यावेळी दिलीपकुमार जाधव, व्यंकाप्पा भोसले, संभाजीराव जगदाळे, रवी जाधव, आदी उपस्थित होते.
 

Web Title: Batiraja award to Swati Krishna couple, distribution on Monday