बापरे..!मोडलेल्या सुईची किंमत ४० हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:27 IST2021-09-21T04:27:49+5:302021-09-21T04:27:49+5:30

कोल्हापूर : एक मोडलेली सुई थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल ४० हजार रुपयांना पडल्याचा अनुभव येथील देवकर पाणंद परिसरातील महिलेला ...

Bapare ..! The price of a broken needle is Rs. 40,000 | बापरे..!मोडलेल्या सुईची किंमत ४० हजार रुपये

बापरे..!मोडलेल्या सुईची किंमत ४० हजार रुपये

कोल्हापूर : एक मोडलेली सुई थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल ४० हजार रुपयांना पडल्याचा अनुभव येथील देवकर पाणंद परिसरातील महिलेला आला आहे. खिशात राहिलेली सुई हातात घुसल्याने ती शस्त्रक्रिया करून काढून टाकावी लागली. त्यासाठी चार दिवस रुग्णालयात राहावे लागले आणि औषध व शस्त्रक्रियेसाठी ४० हजारांचा खर्च आला. मुलांनी खिशात ठेवलेली वस्तू तशीच राहून गेली आणि कपडे धुताना ती हाताला लागण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत.

घडले ते असे : संबंधित महिला कपडे धुताना ही सुई त्यांच्या हातात घुसली. कपडे धुताना हाताचा जोर जास्त असतोच, त्यामुळे सुई मोडली. त्याचा अर्धा भाग मोडून खाली पडला. हात रक्तबंबाळ झाला. परंतु अर्धा भाग पाण्याबरोबर वाहून गेला असावा, असे त्यांना वाटले. औषधोपचार करून घेतले; परंतु हाताच्या वेदना कमी आल्या नाहीत. एकेदिवशी सूर्यनमस्कार घालताना हातावर भार पडला व त्यातून जास्त सूज आल्यावर हाताचा एक्सरे काढण्यात आला. त्यामध्ये सुईचा मोडलेला तुकडा तळहातात राहिला असल्याचे निदान झाले. छोटी शस्त्रक्रिया करून तो काढून टाकावा लागला. आता पंधरा दिवस जखमेचे ड्रेसिंग करावे लागणार आहे. हा सगळा मनस्ताप खिशात विसरून राहिलेल्या वस्तूमुळे झाला. त्यामुळे कपडे धुवायला घेताना महिलांनी खिसे तपासूनच कपडे धुवायला घेण्याची दक्षता घ्यावी, तरच अशा घटना टाळता येतील. मुले अनेकदा शाळेतून येताना रस्त्यात काही सापडले, तर ते खिशात घालतात व सकाळी कपडे तसेच धुवायला टाकतात. त्यावेळी अशा घटना घडण्याचा धोका असतो.

फोटो : २००९२०२१-कोल-पिन न्यूज

Web Title: Bapare ..! The price of a broken needle is Rs. 40,000