शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

किरवले हत्येच्या निषेधार्थ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2017 00:41 IST

कुरुंदवाड, गडहिंग्लजमध्ये प्रतिसाद : समाजकंटकावर कारवाई करण्याची मागणी

गडहिंग्लज / कुरुंदवाड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांचे प्रचारक, संशोधक डॉ. प्रा. कृष्णा किरवले यांच्या हत्येच्या निषेधार्थ येथील सर्वपक्षीय सामाजिक व दलित संघटनेच्यावतीने बुधवारी कुरुंदवाड व गडहिंग्लजमध्ये बंद पाळण्यात आला. शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी संपूर्ण व्यवहार बंद ठेवून बंदला प्रतिसाद दिला. यावेळी हत्या करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पोलिसांना देण्यात आले. कुरुंदवाड येथे प्रारंभी सकाळी विविध सामाजिक संघटना व दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातून निषेध फेरी काढली. यावेळी डॉ. किरवले अमर रहे, किरवले सरांची हत्या करणाऱ्या समाजकंटकाचा निषेध असो, अशा घोषणा देण्यात आल्या. निषेध फेरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात येताच कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी रामदास मधाळे, गौतम ढाले, सुनील कुरुंदवाडे, रामदास आवळे, दिलीप आवळे, संजय कांबळे, चंद्रकांत मोरे, आयुब पट्टेकरी,सतीश भंडारे, शाहीर आवळे, संजय शिंदे, बसाप्पा कांबळे, दिनेश कांबळे यांच्यासह विविध संघटना, दलित संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. बंद शांततेत पाळण्यात आला. (प्रतिनिधी)संघटनांचा सहभागीगडहिंग्लज येथे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या गडहिंग्लज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध दलित संघटना व ‘दानिविप’ संघटनेतर्फे बंदचे आवाहन करण्यात आले होते. दुपारी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांना निवेदन देण्यात आले. किरवलेंच्या हत्येची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी बाबूराव ऐवाळे, प्रकाश कांबळे, दिलीप कांबळे, शिवाजी नाईक, परशराम कांबळे, रमजान अत्तार यांची भाषणे झाली.