शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शिलकी अंदाजपत्रक तरीही पाणीपट्टीत वाढ

By admin | Updated: February 23, 2015 23:57 IST

कागल नगरपालिका : चुकीचे अंदाजपत्रक असल्याचा विरोधकांचा आरोप

कागल : कागल नगरपरिषदेचे २०१५ -१६ या वर्षाचे २८ लाख २५ हजार रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सोमवारी सर्वसाधारण सभेत किरकोळ चर्चा आणि दुरुस्तीनंतर मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा आशाकाकी माने होत्या. उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले, मुख्याधिकारी प्रभाकर पत्की प्रमुख उपस्थित होते. ५१ कोटी १८ लाख १७ हजार रुपये जमा आणि ५० कोटी ८९ लाख २० हजार ५५३ खर्च असे या अंदाजपत्रकाचे स्वरूप आहे. शिलकी अंदाजपत्र असताना पाणी पट्टी वाढविल्याबद्दल विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.सुरुवातीला महिला नगरसेविकांना सभेस येण्यास विलंब झाल्याचा मुद्दा सभागृहाच्या लक्षात आणून देत विरोधी नगरसेवक भैया इंगळे, संजय कदम यांनी कोरमअभावी सभा तहकूब करावी, अशी मागणी केली. त्यावर पक्षप्रतोद रमेश माळी, संजय चितारी यांनी कोरम पूर्ण होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. पालिकेकडे शिल्लक किती रक्कम आहे, आर्थिक स्थिती काय आहे याचा खुलासा होत नसल्याने हे चुकीचे अंदाजपत्रक असल्याचा आरोप करीत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी विरोधकांनी केली. मारुती मदारे यांनी क्रीडा महोत्सवासाठी तरतूद करावी, अशी मागणी केली. मनोहर पाटील, नम्रता कुलकर्णी, आदींनीही सूचना आणि मागण्या यावेळी केल्या.पालिकेचे शिल्लक १२ कोटी ८६ लाख ६० हजार, करापासूनचे उत्पन्न २७ लाख ५० हजार, मालमत्ता महसूल एक कोटी नऊ लाख ७१ हजार ५००, महसुली अनुदान - ४ कोटी २६ लाख ६३ हजार, भांडवली अनुदान - ३९ कोटी ५४ लाख २५ हजार अशी मिळून जमा रक्कम, तर अस्थापना खर्च - ४ कोटी ५६ लाख २६ हजार ५५०, सार्वजनिक सुरक्षा - ५५ लाख ८५ हजार, सार्वजनिक आरोग्यासाठी २ कोटी २८ लाख रुपये अनुदान, वर्गणीसाठी ३३ लाख ६३ हजार, किरकोळ खर्च - ५५ लाख १६ हजार, कर्जासाठी ३ कोटी ५१ लाख, तर भांडवली अनुदानासाठी ३९ कोटी ६१ लाख ६ हजार रुपये खर्चाची तरतूद आहे. ( प्रतिनिधी )मंजूर झालेले काही मुद्देवार्षिक पाणीपट्टीत दहा टक्के वाढ.अपंग कल्याण तरतूद - पाच लाख रुपये.व्याख्यानमाला - तीन लाख रुपये.लेक वाचवा अभियान - तीन लाख रुपये.शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी तरतूद.लोक वर्गणीसाठी ५० लाखांची तरतूद.हद्दवाढ क्षेत्रातील विकासकामांसाठी स्वतंत्र तरतूद.रमाई आवास योजना अनुदान - एक कोटी ६५ लाख रुपये.नगरपालिका वाचनालय पुस्तके खरेदी - एक लाख रुपये.