शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपुरमध्ये मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

By admin | Updated: December 5, 2014 23:38 IST

सर्व पक्षीय संघटनांचा आंदोलनाचा इशारा

जयसिंगपूर : येथील संजीवनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आण्णासाहेब विभूते विद्यामंदिर आणि धरणगुत्ती हायस्कूलमधील मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत. या विरोधात शिवसेना, भाजप, राष्ट्र विकास सेना, रिपाइं, दलित सेनेसह सर्व पक्षांच्या संयुक्त शिष्टमंडळाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी विलास कांबळे यांना निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, या दोन्ही शाळांच्या शिक्षकांमध्ये आणि संस्थापक अध्यक्षांमध्ये वाद सुरू आहेत. या वादातून वारंवार विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार घडत आहेत. दरवर्षी आर्थिक देण्याचा व्यवहार होत असताना संस्थापक अध्यक्ष आडमुठेपणाचे धोरण अवलंबतात. मुख्याध्यापक आणि संस्थाध्यक्ष यांच्या संयुक्त खात्यावर शिष्यवृत्ती आणि दहावीच्या परीक्षा शुल्क परताव्याची रक्कम जमा होत असते. मुख्याध्यापक पैसे काढण्याच्या स्लिपवर स्वाक्षऱ्या करून अध्यक्षांच्या सहीसाठी पाठवितात; मात्र संस्थाध्यक्ष या स्लिपवर सही करीत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आर्थिक लाभांपासून वंचित राहत आहेत. निवेदनावर संतोष जाधव, रतन शिकलगार, विठ्ठल पाटील, शंकर बिराजदार, अ‍ॅड. संभाजीराजे नाईक, सूरज भोसले, अरुण लाटवडे, जगदीश पाटील, साजिदा घोरी, संजय भोसले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)