शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

आजरा कारखाना आजी-माजी संचालकांचा ऊस बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:02 IST

कृष्णा सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : आजरा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस माजी संचालकांसह काही विद्यमान संचालकही बाहेरच्या कारखान्याला पाठवित आहेत. कारखाना टिकविण्याची जबाबदारी आजी-माजी सर्वच संचालकांवर असताना संचालकच ऊस बाहेर पाठवित असल्याने शेतकºयांमध्ये संभ्रमावस्था आहे.चालू हंगामात सर्वच कारखान्यांना तोडणीच्या अपुºया यंत्रणेची अडचण येत आहे. जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांकडे तोडणीची पुरेशी यंत्रणा नसल्याने ...

कृष्णा सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : आजरा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस माजी संचालकांसह काही विद्यमान संचालकही बाहेरच्या कारखान्याला पाठवित आहेत. कारखाना टिकविण्याची जबाबदारी आजी-माजी सर्वच संचालकांवर असताना संचालकच ऊस बाहेर पाठवित असल्याने शेतकºयांमध्ये संभ्रमावस्था आहे.चालू हंगामात सर्वच कारखान्यांना तोडणीच्या अपुºया यंत्रणेची अडचण येत आहे. जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांकडे तोडणीची पुरेशी यंत्रणा नसल्याने ऊस गाळपास जाण्यास विलंब होत आहे. त्याचप्रमाणे cआजरा कारखान्यातही चालू हंगामात अपुरी यंत्रणा आहे. त्यामुळे भागातील ऊस उचलणे जिकिरीचे बनले आहे. तरीदेखील भागातील उसाला प्राधान्य देण्याची गरज आहे.ज्या संचालकांनी कारखान्याच्या जिवावर अनेक वर्षे सत्ता उपभोगली, ऐश्वर्य पाहिले तेच आजी-माजी संचालक कारखान्याला आधार देण्याची गरज असताना बाहेरील कारखान्यांना ऊस देऊन घरचा संसार मोडण्यास हातभार लावत आहेत. कारखाना प्रशासनात काही त्रुटी असल्यास त्या दाखवून देऊन सुधारण्याची संधी देणे अपेक्षित आहे. मात्र, बाहेरील कारखान्याला ऊस देऊन डाव मोडकळीस आणण्याचा प्रयत्न केविलवाणा आहे.प्रशासनात काही चुका वाटत असल्या तरी शेतकºयांची बिले वेळेवर जमा होत आहेत. केवळ राजकारणासाठी अन्य कारखान्यांना प्राधान्य देणे व्यर्थ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. चुकीच्या कारभाराविरोधात प्रहार करण्यास रान मोकळे आहे. मात्र, बाहेर ऊस देऊन आपल्याच पायावर दगड मारून घेतल्यासारखे आहे.हेवेदावे बाजूला ठेवण्याची गरजविभागातील सहकारी तत्त्वावरील एकमेव कारखाना आहे. तो टिकविण्यासाठी आजी-माजी सर्वच संचालकांनी एकत्र बसून कारखाना टिकविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येणे ही काळाची गरज आहे.संचालक पदापुरता आपला कारखानाआजरा कारखाना सहकारी तत्त्वावरील विभागातील एकमेव कारखाना आहे. खासगी कारखान्यांना ऊस घालणाºयांचे हाल वाईट होणार आहेत. त्यामुळे संचालकापुरता आपला कारखाना म्हणणे ही मानसिकता चुकीची असून हक्काचा कारखाना अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.प्रशासनाकडून प्रबोधनाची गरजकारखान्याला ऊस पाठविण्यासाठी सभासदांमध्ये जाऊन प्रशासनाकडून प्रबोधन होताना दिसत नाही. टोळ्या नसल्याने उत्पादक सेंटरचे दरवाजे झिजवत आहेत. पर्यायाने त्यांना अन्य कारखान्यांना ऊस द्यावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनानेही सभासदांपर्यंत जाऊन आजºयालाच ऊस देण्यासाठी आवाहन करण्याची काळाची गरज आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर