शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अयोध्या निकालाची पोलिसांकडून सर्व पातळ््यांवर सतर्कता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 5:03 PM

‘वज्र’ पोलीस व्हॅनसह सशस्त्र पोलिसांचा फौजफाटा, शीघ्र कृती दल, बॉम्बशोध पथक, सायबर क्राइम, दंगल काबू पथकांसह अन्य विभागांतील पथकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. पूर्वतयारी म्हणून पोलीस मैदानावर प्रात्यक्षिक सरावाची जोरदार तयारी सुरू आहे.

ठळक मुद्देअयोध्या निकालाची पोलिसांकडून सर्व पातळ््यांवर सतर्कतासलोखा राहण्यासाठी प्रयत्न : विविध घटकांवर बारकाईने आहे लक्ष

कोल्हापूर : अयोध्येतील वादग्रस्त जागेचा निकाल सर्वोच्च न्यायालय १२ ते १७ नोव्हेंबरदरम्यान देणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताची जय्यत तयारी केली असून, समाजात सलोखा राहण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ बनविला आहे.

‘वज्र’ पोलीस व्हॅनसह सशस्त्र पोलिसांचा फौजफाटा, शीघ्र कृती दल, बॉम्बशोध पथक, सायबर क्राइम, दंगल काबू पथकांसह अन्य विभागांतील पथकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. पूर्वतयारी म्हणून पोलीस मैदानावर प्रात्यक्षिक सरावाची जोरदार तयारी सुरू आहे.अयोध्येतील निकालाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर, इचलकरंजी, आजरा परिसरांत पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असून सोशल मीडियावर विशेष लक्ष आहे.

या निकालानंतर कोणत्याही समाजाच्या नागरिकांनी जल्लोष करू नये, कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील असे व्हिडीओ क्लिप, फोटो, संदेश सोशल मीडियावर प्रसारित करू नयेत. आक्षेपार्ह संदेश, व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यांवर भादंवि कलम १८८ नुसार आणि सायबर अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.या कलमानुसार होणार कारवाईभारतीय दंडसंहिता कलम १८८/२९५/२९८- कोणत्याही वर्गाचा, धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानाचे नुकसान करणे. बुद्धिपुरस्सर व दुष्ट उद्देशाने कृती करणे, धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने शब्द उचारणे यासंबंधी दखलपात्र गुन्हे दाखल करून तत्काळ अटकसत्र आणि न्यायालयात हजर करणे.हे करू नये

  • जमाव करून थांबू नये.
  • सोशल मीडियावर संदेश प्रसारित करू नये.
  • निकालानंतर गुलाल उधळू नये, फटाके वाजवू नयेत.
  • महाआरती अथवा समूहपठण यांचे आयोजन करू नये.
  • साखर, पेढे, मिठाई वाटू नये.
  • घोषणाबाजी, जल्लोष करू नये.
  • मिरवणुका, रॅली काढू नये.
  • भाषणबाजी करू नये.

रामजन्मभूमी व बाबरी मशीद या संवेदनशील विषयावर सर्वोच्च न्यायालयाकडून काही दिवसांत निकाल अपेक्षित आहे. हा निकाल देणारी यंत्रणा ही देशाची सर्वोच्च न्यायव्यवस्था आहे. तिच्यावर भारतीय जनतेचा विश्वास आहे. त्या निकालाचा आदर करून नागरिकांनी शांतता राखावी.- डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर