शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

पेठ वडगावात अस्ताव्यस्त पार्किंग, वाहतूक कोंडी नित्याचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क/ सुहास जाधव, पेठवडगाव : वडगाव शहरामध्ये वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच पार्किंगची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली ...

लोकमत न्यूज नेटवर्क/ सुहास जाधव, पेठवडगाव : वडगाव शहरामध्ये वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच पार्किंगची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. शहरातील पालिका चौक, बिरदेव चौक, गांधी चौक तसेच पद्मा रोड व धान्य लाईन बाजारपेठ, आदी महत्त्वाच्या रस्त्यांवर जागा मिळेल तिथे अस्ताव्यस्त पार्किंग केले जात आहे. त्यामुळे पार्किंगचा प्रश्‍न भेडसावत असून नगरपालिका व पोलिसांनी संयुक्त बैठक घेऊन पार्किंगसाठी मास्टर प्लॅन बनविण्याची गरज आहे.

वडगाव हे कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी घडामोडीचे महत्त्वाचे शहर आहे. परिसरातील हक्काची बाजारपेठ असल्याने नागरिकांची मोठ्या संख्येने शहरात ये-जा होत असते. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहनांचे प्रमाण वाढले आहे. कोकणसह ग्रामीण भागातून विविध वस्तूंची आवक-जावक शहरातून होत असते. शहरातील प्रमुख रस्त्यांवर पार्किंगबाबत नुसते फलक लावलेले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने पार्किंगची समस्या मोठी होऊ लागली आहे.

बसस्थानक, विजयसिंह यादव चौक, पालिका चौक, मार्केट यार्ड रोड, आदी ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत असते. बसस्थानकासमोर रस्त्यावर अतिक्रमणे झाल्यामुळे या रोडवर पादचाऱ्यांना चालणेदेखील कठीण होऊन बसले आहे. शहरातील अनेक रस्ते अरुंद असून या रस्त्यावर आपत्कालीन व्यवस्था पुरविणे जिकिरीचे आहे. बुधवारी तुकाईनगरमध्ये उसाला आग लागली होती. येथे अग्निशमन दल तत्काळ पोहोचले. मात्र, अरुंद रस्ते असल्यामुळे रिव्हर्सने अग्निशमन गाडी मागे घेण्याची नामुष्की आली. शहरातील अनेक नव्या व्यापारी संकुलाला पार्किंगची सोय नसल्याने बहुतांश वाहने ही रस्त्यावरच लावली जातात. पालिकेकडून मंजूर केलेल्या प्लॅनमध्ये काहींनी पार्किंग दाखवूनही नंतर मूळचा प्लॅन बदलल्याचे दिसते. अशांवर पालिका प्रशासन कारवाई करणार का, असा प्रश्‍न आहे.

पार्किंगसाठी जागा नसल्यानेच चारचाकी, दुचाकी वाहने रस्त्यावरच उभी केली जात आहेत. याचा त्रास वाहतुकीला होत असून शहरातील आंबा रोड, डाॅ. आंबेडकर चौक, पालिका चौक, यादव चौक, बिरदेव चौक, हनुमान रोड येथे वारंवार वाहतुकीची कोंडी होते. पार्किंगबाबत अनेकवेळा केवळ चर्चा झाली आहे. मात्र, पोलीस व पालिका प्रशासनाने कोणतीही ठोस योजना केलेली नाही. रस्त्यावर फिरुन व थांबून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना रस्ता हा पादचारी, वाहतुकीसाठी असतो. हे सांगून शिस्त लावणे गरजेचे आहे. सुरळीत वाहतुकीसाठीची जबाबदारी पोलीस व पालिकेची आहे. मात्र, ठोस उपाययोजना होत नाही ही वस्तुस्थिती आहे. आता पालिकेने पार्किंगबाबतचा मास्टरप्लॅन बनवावा, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे

फोटो ओळ 1.पेठवडगाव: येथील तुकाईनगर येथे आपत्तीमध्ये कसरत करून अग्निशमन गाडी नेताना पालिका कर्मचारी. (छाया : क्षितिज जाधव)

2. पेठवडगाव: येथील बिरदेव चौकात एक दिशा मार्गातून जाताना अशी अवजड वाहनांना कसरत करावी लागते. (छाया : क्षितिज जाधव)