Kolhapur: शिवाजी विद्यापीठाची वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न फसला, फायर वॉलमुळे धोका टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 18:03 IST2025-01-24T17:50:33+5:302025-01-24T18:03:01+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ (वेबसाइट) हॅक करण्याचा प्रयत्न गुरुवारी दुपारी झाला. फायर वॉलमुळे हॅकर्सचा प्रयत्न फसला. कुलगुरू ...

Kolhapur: शिवाजी विद्यापीठाची वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न फसला, फायर वॉलमुळे धोका टळला
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ (वेबसाइट) हॅक करण्याचा प्रयत्न गुरुवारी दुपारी झाला. फायर वॉलमुळे हॅकर्सचा प्रयत्न फसला. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी तत्काळ दखल घेत सुरक्षेचे आढावा घेतला.
विद्यापीठाची वेबसाइट गेल्या काही महिन्यांपूर्वी हॅक करून त्यावरील वॉटरमार्कसह इतर गोष्टींचा वापर करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन वेबसाइटच्या सुरक्षेसाठी चोख उपाययोजना केल्या. मात्र गुरुवारी पुन्हा विद्यापीठाची वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न हॅकर्सने केला. गुगल सर्च इंजीनद्वारे शिवाजी विद्यापीठाची वेबसाइट शोधणाऱ्या व्यक्तींना ‘ही साइट हॅक झाली असण्याची शक्यता आहे,’ अशा स्वरूपाचा संदेश दुपारपासून दिसत होता. बिंग, डकडकगो आदी अन्य सर्च इंजीनवर असा संदेश दिसत नव्हता.
तरीही खबरदारीचा उपाय म्हणून संगणक केंद्रामार्फत फायरवॉल सुरक्षेची तपासणी केली असता काही पृष्ठे हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. या पृष्ठांबाबत खबरदारी घेतली आहे. तसेच गुगल सर्च इंजीनला कळविले आहे. दरम्यान, शिवाजी विद्यापीठाची वेबसाइट हॅक करण्याचा झालेला प्रयत्न फायरवॉलमुळे असफल ठरला आहे. विद्यापीठाची वेबसाइट सुरक्षित आहे, असे संगणक केंद्राचे संचालक अभिजित रेडेकर यांनी सांगितले.