शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून तीनबत्ती चौकात घरांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:18 IST

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीनबत्ती चौकातील घरांवर अज्ञात जमावाने हल्ला करत काही घरांमधील प्रापंचिक साहित्यासह तीन ...

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीनबत्ती चौकातील घरांवर अज्ञात जमावाने हल्ला करत काही घरांमधील प्रापंचिक साहित्यासह तीन दुचाकींची तोडफोड केली. बुधवारी संध्याकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास झालेल्या या प्रकाराने परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने तणाव निवळण्यास मदत झाली. पूर्ववैमनस्यातून बुधवारी रात्री सव्वासात वाजण्याच्या सुमारास १५ ते २० अज्ञात हल्लेखोरांनी या परिसरातील घरांवर अचानक हल्ला केला. त्यात काही घरांमधील साहित्याची तोडफोड केली. हे हल्लेखोर हातात दगड, लाकडी दंडुके, फरशांनी दिसेल त्या बंद घरांच्या दरवाजांची तोडफोड करत सुटले होते. यावेळी काही घरांमध्ये घुसून त्यांनी प्रापंचिक साहित्याची तोडफोड करून नुकसान केले. या दरम्यान हल्लेखोर दिसेल त्या महिलांनाही मारत सुटले होते. यात रातआंधळी असलेल्या महिलेलाही या हल्लेखोरांनी सोडले नाही. तीही या हल्ल्यात जखमी झाली. तिला रात्री उशिरा नातेवाईकांनी सेवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काही घरांवर हल्ला करून या टोळक्याने चौकात उभ्या केलेल्या तीन दुचाकींचीही तोडफोड केली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत राजारामपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेचे गांभीर्य ओळखून शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह राजारामपुरी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर तत्काळ पोलिसांनी चौकात बसवलेल्या तीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजद्वारे संशयित टोळक्यांचे फुटेज ताब्यात घेतले असून, त्याआधारे तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत संशयितांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम राजारामपुरी पोलीस ठाण्यात सुरु होते.

फोटो : ०२०६२०२१-कोल-तीन बत्ती ०१,०३

ओळी : राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीनबत्ती चौकातील काही घरांवर बुधवारी संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करत तोडफोड केली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा दाखल झाला. फोटो : ०२०६२०२१-कोल-तीनबत्ती ०२

ओळी : राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीनबत्ती चौकातील काही घरांवर बुधवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करत तोडफोड केली. त्याचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

(छाया : आदित्य वेल्हाळ)