शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

जिल्हा परिषदेत खळबळ : बदल्यांतील ‘ढपल्या’वरून वातावरण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:52 IST

प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्यावर दबाव टाकून गुरुवारी (दि. ६) रात्री १० वाजता १४ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या आदेशांवर सह्या घेतल्याचे वृत्त शुक्रवारी प्रसिद्ध होताच जिल्हा परिषदेत खळबळ उडाली. दरम्यान

ठळक मुद्देशिक्षक बदलीत ढपला नाही-बजरंग पाटील; चौकशी समिती नेमा-विजय भोजे

कोल्हापूर : ‘जिल्हा परिषदेच्याशिक्षकांच्या बदल्यांमध्ये कोणीही ‘ढपला’ पाडलेला नाही. ज्यांनी कुणी तसे केले असेल तर त्याच्या नावासह छापा,’ असे सांगत अध्यक्ष बजरंग पाटील यांनी आपली भूमिका शुक्रवारी स्पष्ट केली. मात्र, या सर्व प्रकाराबाबत चौकशी समिती नेमण्याची मागणी भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे यांनी केली.

प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्यावर दबाव टाकून गुरुवारी (दि. ६) रात्री १० वाजता १४ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या आदेशांवर सह्या घेतल्याचे वृत्त शुक्रवारी प्रसिद्ध होताच जिल्हा परिषदेत खळबळ उडाली. दरम्यान, या सर्व बदल्यांबाबत खुद्द शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनाच काही कल्पना नसल्याने त्यांनीही उबाळे यांना सुनावले आणि उबाळे यांनीही ‘येथे खूपच दबावाखाली काम करावे लागते,’ असे स्पष्ट केल्याने वातावरण अधिकच तापले.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली. यामध्ये ‘अशा पद्धतीने आरोप होतोच कसा?’ असा सवाल उपस्थित करीत ‘तातडीने खुलासा करावा,’ अशी मागणी केली. यावेळी शिक्षण सभापती यादव यांनीही याबाबत मलाच कशी माहिती दिली नाही, अशी विचारणा केल्याचेही कळते. यानंतर तातडीने अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या कार्यालयाकडून निरोप दिले आणि पत्रकार बैठक घेण्यात आली.

बजरंग पाटील म्हणाले, माणूस आहे म्हटले की चूक होणार; परंतु केवळ आरोप करू नका. आम्ही नवीन आहोत. ज्याने कुणी तसे केले असेल आणि तुमच्याकडे पुरावा असेल, तर त्याचे नाव छापा.उपाध्यक्ष सतीश पाटील म्हणाले, बदल्यांमध्ये अन्याय झाला असेल, बदल्या नियमांत असतील तर त्या कराव्याच लागतील. कामाच्या ताणतणावामुळे शिक्षणाधिकारी अस्वस्थ असतील; पण आम्ही कुणीही दबाव टाकलेला नाही.

मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सुनावणी घेतल्यानंतर या बदल्या झालेल्या आहेत.शिक्षण सभापती प्रवीण यादव म्हणाले, गुरुवारी त्या बदल्यांबाबत त्या कराच, असा आम्ही कुणीही आग्रह धरलेला नाही. फक्त एकमेकांचा सन्मान राखून काम होण्याची गरज आहे. पक्षप्रतोद उमेश आपटे म्हणाले, शिक्षण विभागाच्या कामाचा व्याप मोठा आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बसूनही अधिकारी, कर्मचाऱ्यांना काम करावे लागते.

अधिका-यांना तणाव असतोच. यावेळी बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, राजेश पाटील, शशिकांत खोत यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे उपस्थित होत्या.

नेत्यांनी फोन करून सुनावलेवृत्तपत्रांतून आलेल्या बातम्यांची दखल घेऊन पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सुनावल्याचे सांगण्यात आले. ‘जर तुम्ही यात दोषी नाही तर पत्रकार परिषद घेऊन तसे स्पष्ट करा,’ असेही या नेत्यांनी सांगितले. त्यामुळेच अध्यक्ष पाटील यांनी तातडीने पत्रकार बैठक घेऊन भूमिका स्पष्ट केली.

मग, बदल्यांना पावणेदोनमहिने का लागले ?मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी १० डिसेंबर २०१९ रोजी सुनावणी घेतल्यानंतरच्या बदल्यांचे हे आदेश काढले आहेत. मग, हे बदल्यांचे आदेश देण्यासाठी एक महिना २४ दिवस का लागले? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे, परीक्षा तोंडावर असताना या शिक्षकांच्या तातडीने बदल्यांची गरज होती का? अशीही विचारणा होत आहे.

विभागीय आयुक्तांचे अधिकार कारभाऱ्यांना दिलेत काय ?आम्ही शिक्षकांच्या बदल्यांबाबत अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर विभागीय आयुक्तांची परवानगी घेण्याची गरज असल्याचे ते सांगत होते. मग, आता विभागीय आयुक्तांचे अधिकार कारभाºयांना दिलेत काय? अशी विचारणा भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. शिक्षण विभागातील बदल्या आणि खरेदीमध्ये पारदर्शकता यावी यासाठी सर्वपक्षीय चौकशी समिती नेमण्याची मागणीही भोजे यांनी केली.

टॅग्स :zpजिल्हा परिषदTeacherशिक्षकkolhapurकोल्हापूर