शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

‘एटीएम’ची सुरक्षा रामभरोसेच

By admin | Updated: August 26, 2015 00:34 IST

जयसिंगपुरातील स्थिती : सुरक्षारक्षकच नाहीत; उपनगरासह ग्रामीण भागातील मशीनकडे बँकेचे दुर्लक्ष

संतोष बामणे - जयसिंगपूरसध्याच्या धावत्या युगामध्ये जलद पैसे काढण्यासाठी व २४ तास सेवा देणारी महत्त्वपूर्ण दुवा म्हणून ‘एटीएम’ मशीन ठरली आहे. मात्र, जयसिंगपूरसह परिसरातील एटीएम सेवा पाहिली असता सुरक्षारक्षकाविना काही एटीएम शहरामध्ये आहेत. मात्र, यामधून रात्री-अपरात्री पैसे काढणे धोक्याची घंटा ठरत आहेत, तर काही एटीएमसमोर अंधारमय परिसर असल्यामुळे नागरिक पैसे काढताना भयभीत होत आहेत. त्यामुळे काही मशीन हे रामभरोसेच असल्याचे जाणवत आहे.सध्या शहरामध्ये २५ हून अधिक एटीएम मशीन असून काही बॅँकांच्या एटीएमसाठी सुरक्षारक्षक आहेत, तर काही एटीएम सुरक्षारक्षकाविनाच आहेत. त्यामुळे पैसे काढून परत येताना लुटमारीच्या शक्यतेमुळे कार्डधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे, तर राज्यामध्ये काही ठिकाणी सुरक्षारक्षक नसलेल्या ठिकाणी एटीएम फोडून लाखो रुपयांची लूट केल्याच्या घटना ताज्या आहेत. त्यामुळे आता एटीएमकडे बॅँकांनी दुर्लक्ष न करता सुरक्षारक्षक नेमण्याची गरज आहे.संवेदनशील व आडमार्गावर असलेल्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्याची सक्त गरज आहे. बॅँक व ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठीएटीएम लाभदायक ठरली आहेत. मात्र, एटीएमवरील रक्कम परस्पर उचलणारी रॅकेटही सध्या कार्यरत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.जयसिंगपूर शहर, उपनगरे, औद्योगिक वसाहती व परिसरातील गावांमध्ये एटीएमला सुरक्षारक्षक नाहीत व परिसरात अंधार असल्यामुळे वर्दळ नसलेल्या ठिकाणी काही एटीएम आहेत. याठिकाणी बॅँकांनी लक्ष देऊन आपल्या एटीएमच्या व ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी लवकरात लवकर सुरक्षारक्षक व पुरेशी प्रकाशाची व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे.सीसीटीव्ही कॅमेरे उच्च दर्जाचे नाहीतसध्या काही एटीएममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उच्च दर्जाचे नाहीत. छायाचित्र घेणाऱ्या कॅमेऱ्यांची गुणवत्ता चांगली असणे गरजेचे आहे. प्रत्येक एटीएममध्ये स्वच्छ प्रकाश, हवा यासाठी पुरेपूर प्रकाशाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. पैसे काढणे व भरणे याशिवाय काही गैरप्रकार होत असेल, तर सायरनची व्यवस्था करणे गरजेचे आहे. एटीएमच्या आतमध्ये जसे कॅमेरे आहेत. तसे बाहेरही लावण्याची गरज भासत आहे.