अश्वमेध वाठार संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:22 IST2021-04-16T04:22:41+5:302021-04-16T04:22:41+5:30

कोल्हापूर : अश्वमेध वाठार संघाने सहारा अण्णा मोगणे संघावर पहिल्या डावातील अधिक्यावर मात करीत चाटे चषक स्पर्धेची अंतिम फेरी ...

Ashwamedh Wathar team enters final | अश्वमेध वाठार संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

अश्वमेध वाठार संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

कोल्हापूर : अश्वमेध वाठार संघाने सहारा अण्णा मोगणे संघावर पहिल्या डावातील अधिक्यावर मात करीत चाटे चषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

शाहूपुरी जिमखाना मैदानावर झालेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना सहारा अण्णा मोंगणे संघाने पहिल्या डावात २०.३ षटकांत सर्वबाद ६३ धावा केल्या. यात अभिनंदन गायकवाडने ३१, वरद माळी याने १० धावा केल्या. अश्वमेधकडून आदित्य बराले व अभिषेक इचलकर यांनी भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन करीत प्रत्येकी चार गडी बाद केले. सुधीर तोडकरने दोन बळी घेत उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. उत्तरादाखल खेळताना अश्वमेध वाठार संघाने पहिल्या डावात सर्वबाद ८९ धावा केल्या. यात एकलव्य खाडे याने नाबाद २३ आणि प्रथमेश निगडे याने २५, आदित्य बराले ११, सुधीर तोडकर १० यांनी चांगली फलंदाजी केली. सहाराकडून गोलंदाजी करताना रचित चौगले व प्रथमेश साठे यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. वरद माळी याने दोन व रोहित गिरी याने एक बळी घेतला. अश्वमेधकडून दुसऱ्या डावात ४१ षटकांत ७ बाद १२७ धावा केल्या. त्यात प्रथमेश निगडे याने ४७, सुधीर तोडकरने नाबाद ४४, हर्ष आमणे याने ११ धावा केल्या. सहाराकडून अभिषेक आमरे याने चार, समरंग पाटील व वरद माळी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. पहिल्या डावातील २६ धावांच्या अधिक्यावर अश्वमेध वाठारने अंतिम फेरीत प्रवेश केला. यापुढील सामने शनिवारी (दि.१) मे रोजी पुन्हा सुरू होणार आहेत.

Web Title: Ashwamedh Wathar team enters final