अशोक भोईटे प्रभारी कुलगुरू

By Admin | Updated: February 26, 2015 00:53 IST2015-02-26T00:53:02+5:302015-02-26T00:53:04+5:30

कुलगुरू डॉ. पवार यांनी ज्या ताकदीने विद्यापीठाची यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. ती कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील, असे भोईटे यांनी सांगितले.

Ashok Bhoiate Incharge Vice-Chancellor | अशोक भोईटे प्रभारी कुलगुरू

अशोक भोईटे प्रभारी कुलगुरू

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे ‘प्रभारी कुलगुरू’ म्हणून डॉ. अशोक भोईटे यांची नियुक्ती झाली आहे. राज्यपाल कार्यालयातून याबाबतचा फॅक्स बुधवारी दुपारी विद्यापीठ प्रशासनाला मिळाला. भोईटे सध्या प्र-कुलगुरूपदी कार्यरत होते. विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी ९ डिसेंबर २०१२ मध्ये भोईटे यांची नियुक्ती झाली. विद्यापीठ कायद्यानुसार कुलगुरूंच्या मुदतीबरोबर प्र-कुलगुरूंची मुदत संपते. त्यानुसार बुधवारी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्यासमवेत भोईटे यांचीही मुदत संपली. मुदत संपणार असल्याची माहिती डॉ. पवार यांनी राज्यपाल कार्यालयाला कळविली होती. शिवाय दोन दिवसांपूर्वी मुंबईतील बैठकीनंतर त्यांनी याबाबत संबंधित कार्यालयाशी चर्चा केली होती. त्यानंतर प्रभारी कुलगुरू म्हणून भोईटे यांची नियुक्ती करण्याचा आल्याचा फॅक्स बुधवारी दुपारी राज्यपाल कार्यालयातून विद्यापीठाला मिळाला. त्यात नवीन कुलगुरूंची नियुक्ती होईपर्यंत ते प्रभारी कुलगुरू म्हणून काम करतील, असे म्हटले आहे. भोईटे यांनी यापूर्वी साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स, एन. डी. पाटील महाविद्यालय मलकापूर याठिकाणी प्राचार्य म्हणून काम पाहिले आहे. रयत शिक्षण संस्थेत ते २००५ ते ०८ या कालावधीत सचिव होते. कुलगुरू डॉ. पवार यांनी ज्या ताकदीने विद्यापीठाची यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. ती कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न
राहील, असे भोईटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Ashok Bhoiate Incharge Vice-Chancellor