शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

Kolhapur: अरुण डोंगळेंचे बंड, गोकुळ दूध संघात सतेज-मुश्रीफ यांना हादरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:33 IST

‘महायुती’च्या कार्डचा वापर : दूधाला राजकारणाची उकळी

कोल्हापूर : ‘गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिल्याने सत्तारूढ गटाला जोरदार हादरा बसला आहे. डोंगळे यांच्या भूमिकेवर आता वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील हे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. नियमाप्रमाणे संघाची मासिक बैठक गुरुवारी होणार आहे.चार वर्षांपूर्वी ‘गोकुळ’च्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके आदींना सोबत घेऊन माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार दिवंगत पी. एन. पाटील यांच्याकडून सत्ता काढून घेतली होती. त्यानंतर सत्तारूढ गटातून बाहेर पडलेल्या ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांना प्रत्येकी दोन-दोन वर्षे अध्यक्षपदाची संधी दिली. डोंगळे यांची मुदत २५ मे रोजी संपत असून, तत्पूर्वी राजीनामा देण्याच्या सूचना मंत्री मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी दिल्या आहेत. पण, अध्यक्ष डोंगळे यांचे महायुतीच्या नेत्यांसाेबतचे घनिष्ठ संबंध आणि त्यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द, व्यवहार पाहता, ते राजीनामा देणार नाहीत, अशीच चर्चा गेली सहा महिने ‘गोकुळ’च्या वर्तुळात सुरू होती. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून ‘महायुती’चे कार्ड पुढे केल्याने सत्तारूढ गटासमोर पेच निर्माण झाला आहे.

मुश्रीफ यांचे सुतोवाच..‘गोकुळ’च्या मागील निवडणुकीत अरुण डोंगळे यांनी महादेवराव महाडिक व आमदार दिवगंत पी. एन. पाटील यांच्या विरोधात उघड बंद केल्याने ते कधीही कोणत्याही थराला जाऊ शकतात, याचा अंदाज नेत्यांना आहे. त्यामुळेच संघाच्या दीड महिन्यांपूर्वी झालेल्या दूध उत्पादकांच्या सत्कार समारंभात मंत्री हसन मुश्रीफ यांनी अरुण डोंगळे व विश्वास पाटील यांना आगामी निवडणुकीत एकत्र राहा, असा सल्ला दिला होता.

‘गोकुळ’मधील बलाबल..महायुती (१०) : अरुण डोंगळे, अजित नरके, शौमिका महाडिक, अंबरीश घाटगे, एस. आर. पाटील, अभिजित तायशेटे, नंदकुमार ढेेंगे, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील.महाविकास आघाडी (०८) : विश्वास पाटील, बाबासाहेब चौगले, बाळासाहेब खाडे, शशिकांत पाटील-चुयेकर, डॉ. चेतन नरके, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, अंजना रेडेकर.हसन मुश्रीफ समर्थक (०३) : नवीद मुश्रीफ, प्रा. किसन चौगले, रणजितसिंह पाटील.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul MilkगोकुळPoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी