शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शहरात १६० ठिकाणी गणेश विसर्जन कुंडांची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:29 IST

कोल्हापूर : गणेशोत्सवातील गर्दी टाळण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून घरगुती गणपती विसर्जनासाठी शहराच्या विविध भागात १६० ...

कोल्हापूर : गणेशोत्सवातील गर्दी टाळण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून घरगुती गणपती विसर्जनासाठी शहराच्या विविध भागात १६० कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी आपापल्या भागातच मूर्तींचे विसर्जन करून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन गुरुवारी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत केले.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्य शासनाने जाहीर केलेले नियम पाळावेत, आगमनाची मिरवणूक, विसर्जनास होणारी गर्दी टाळून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही बलकवडे यांनी यावेळी केले.

महापालिकेमार्फत शहरात नागरिक, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था, पर्यावरण क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते यांच्या सहयोगाने शहराच्या विविध भागात घरगुती गणेश विसर्जनासाठी १६० कृत्रिम कुंड तयार करण्यात येत आहेत. अशा कुंडातच मूर्ती विसर्जित कराव्यात. विसर्जित मूर्ती नंतर इराणी खणीत सोडल्या जाणार आहेत. त्यासाठी ९० टेंपो, ट्रॅक्टर, प्रत्येक वाहनावर दोन कर्मचाऱ्यांसह पालिकेचे २०० कर्मचारी, चार जेसीबी अशी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे, असे बलकवडे यांनी सांगितले.

विसर्जनाच्या ठिकाणी सहा वैद्यकीय पथके, विद्युत पथके, स्वच्छता पथके तयार करण्यात आली आहेत. याशिवाय निर्माल्य गोळा करण्याकरिता बारा पथके तयार केली आहेत. आरोग्य विभागाचे ३०० कर्मचारी या पथकात असतील. निर्माल्य गोळा करून खत निर्मितीसाठी देण्यात येणार आहे.

शहराची स्वच्छता, कोरोनापासून बचाव याकरिता जनजागृती करणाऱ्या देखाव्यांसाठी महापालिकेने स्पर्धा आयोजित केली आहे. मंडळांनी आपापल्या परिसरात ही जनजागृती करायची आहे. त्याकरिता विजेत्या मंडळांना प्रशस्तीपत्रक, गौरवचिन्ह देण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेस अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे उपस्थित होते.

- सहा मंडळांना नोटीस -

शहरातील सहा मंडळांनी निश्चित केलेल्या दहा बाय दहा साईजपेक्षा जादा आकाराचा मंडप घातला होता. त्यांना विभागीय कार्यालयामार्फत नोटीस देऊन मंडपाचा आकार कमी करण्यास सांगण्यात आले, असे शहर अभियंता सरनोबत यांनी सांगितले.