शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: सांबरे येथील महाप्रसादातून ३०० जणांना विषबाधा, आरोग्य यंत्रणेची तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 19:52 IST

खाद्यपदार्थांचे नमुने घेतले, नेसरी पंचक्रोशीतील भाविक : गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील दवाखान्यात उपचार

गडहिंग्लज / नेसरी : सांबरे (ता.गडहिंग्लज) येथील धार्मिक कार्यक्रमानिमित्त आयोजित महाप्रसादातून सुमारे २५० ते ३०० नागरिकांना विषबाधा झाली आहे. त्यामुळे वयोवृद्धांसह पुरुष, महिला व बालकांचाही समावेश आहे. त्यांच्यावर नेसरी ग्रामीण रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय, कानडेवाडी, मुंगुरवाडी, सांबरे, कोवाड, माणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे गडहिंग्लज विभागासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.गुरुवारी (४) हा धार्मिक कार्यक्रम झाला. त्यानंतर, शुक्रवारी (५) सकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० नंतर महाप्रसादाला सुरुवात झाली. त्यानंतर, महाप्रसाद घेतलेल्यांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे संबंधितांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.येथील ग्रामीण रुग्णालयातील खाटांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे एकेका खाटावर दोन-तीन रुग्ण आणि उर्वरित रुग्णांना जमिनीवर झोपवून उपचार करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर लहान मुलांना गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले, तसेच अन्य रुग्णांना कानडेवाडी, मुंगूरवाडी, सांबरे, कोवाड, माणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. काहींनी गडहिंग्लजसह परिसरातील खासगी रुग्णालयात धाव घेतली.दरम्यान, माजी आमदार राजेश पाटील, प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, नेसरीच्या सरपंच गिरीजादेवी शिंदे, संग्रामसिंह कुपेकर, विद्याधर गुरबे, नागेश चौगुले, महेश कोरी, नरेंद्र भद्रापूर, भारती जाधव आदींनी रुग्णालयांना भेट देऊन रुग्ण व नातेवाइकांची विचारपूस केली. नेसरी व गडहिंग्लजचे वैद्यकीय अधीक्षक चंद्रकांत खोत, गडहिंग्लज तालुका आरोग्य अधिकारी गीता कोरे, प्रशांत कोरे, डॉ.श्याम सागर, स्वाती पाटील आदींनी उपचार केले.‘सीपीआर’सह बेळगाव येथील केएलई, गडहिंग्लजचे केदारी रेडेकर रुग्णालय, महागावचे संत गजानन महाराज रुग्णालयाचे वैद्यकीय पथक सांबरे येथे दाखल झाले आहे. नेसरी परिसरातील आशासेविका आणि आरोग्यसेवक यांनाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे.

खाद्यपदार्थांचे नमुने घेतलेमहाप्रसादात शिरा, भात, आमटी, कोबी व बटाट्याची भाजीचा समावेश होता. अन्न आणि औषध प्रशासनाने महाप्रसादातील खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. विषबाधा कशातून झाली, हे तपासणी अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यतादरवर्षीप्रमाणे या वर्षीही सुमारे २ हजार भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. सांबरे ग्रामस्थांसह काळमवाडी, यमेहट्टी, तावरेवाडीसह नेसरी पंचक्रोशीतील भाविक ‘श्रीं’चे दर्शन आणि महाप्रसादासाठी आले होते. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

डॉक्टरांसह नातेवाइकांचीही तारांबळज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना अधिक त्रास जाणवत होता. त्यांच्या उपचारासाठी वैद्यकीय पथकासह नातेवाइकांचीही तारांबळ उडाली. रुग्णांना उपचारासाठी आणण्यासाठी गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील सर्व रुग्णवाहिकांसह खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.

सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबीटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार शिवाजी पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक प्रशांत वाडीकर यांनी भ्रमनध्वनीवरून माहिती घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Food poisoning strikes 100 villagers after Datta Jayanti feast.

Web Summary : Around 100 villagers in Sambre, Gadhinglaj, suffered food poisoning after consuming Mahaprasad during Datta Jayanti celebrations. Affected individuals were admitted to Gadhinglaj Government Hospital. Their condition is now stable.