Kolhapur News: दत्त जयंतीच्या महाप्रसादातून शंभर गावकऱ्यांना विषबाधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 19:52 IST2025-12-05T19:51:07+5:302025-12-05T19:52:26+5:30
कोल्हापूर : दत्त जयंतीच्या महाप्रसादातून सुमारे शंभर गावकऱ्यांना विषबाधा झाली. गडहिंग्लज तालुक्यातील सांबरे गावात ही घटना घडली. विषबाधित रुग्णांना ...

Kolhapur News: दत्त जयंतीच्या महाप्रसादातून शंभर गावकऱ्यांना विषबाधा
कोल्हापूर: दत्त जयंतीच्या महाप्रसादातून सुमारे शंभर गावकऱ्यांना विषबाधा झाली. गडहिंग्लज तालुक्यातील सांबरे गावात ही घटना घडली. विषबाधित रुग्णांना गडहिंग्लज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
सांबरे गावात दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसाद घेतला असता सुमारे शंभर गावकऱ्यांना विषबाधा झाल्याने उलट्याचा त्रास सुरु झाला. विषबाधा झालेल्या गावकऱ्यांवर नेसरी आणि परिसरातील रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. मात्र ३० ते ४० रुग्णांना अधिक उपचारासाठी गडहिंग्लज येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. सर्व गावकऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली.