आर्किटेक्टस, इंजिनिअर्स सभासदांचे हित जोपासणार विकासाला बळ देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 12:57 AM2018-09-07T00:57:23+5:302018-09-07T00:59:20+5:30

कोल्हापूरच्या आर्किटेक्टस् आणि इंजिनिअर्स यांची शिखरसंस्था असणाऱ्या ‘असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅन्ड इंजिनिअर्स कोल्हापूर’चे नूतन अध्यक्ष व इंजिनिअर्स अजय कोराणे यांच्याशी संस्थेची वाटचाल,

Architect, engineers will strengthen the interests of the members of the community | आर्किटेक्टस, इंजिनिअर्स सभासदांचे हित जोपासणार विकासाला बळ देणार

आर्किटेक्टस, इंजिनिअर्स सभासदांचे हित जोपासणार विकासाला बळ देणार

Next
ठळक मुद्देसंस्थेची वाटचाल, उपक्रम, प्राधिकरण आणि डी क्लास बांधकाम नियमावलीबाबत साधलेला हा थेट संवाद...प्रबोधनपर सामाजिक उपक्रम राबविले जातील.

कोल्हापूरच्या आर्किटेक्टस् आणि इंजिनिअर्स यांची शिखरसंस्था असणाऱ्या ‘असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅन्ड इंजिनिअर्स कोल्हापूर’चे नूतन अध्यक्ष व इंजिनिअर्स अजय कोराणे यांच्याशी संस्थेची वाटचाल, उपक्रम, प्राधिकरण आणि डी क्लास बांधकाम नियमावलीबाबत साधलेला हा थेट संवाद...

प्रश्न : असोसिएशनच्या आजपर्यंतच्या वाटचालीबाबत काय सांगाल?
उत्तर : राज्यातील एक सर्वांत जुनी आणि कार्यशील असोसिएशन म्हणून ‘असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅँड इंजिनिअर्स, कोल्हापूर’ची ओळख आहे. गेल्या ४७ वर्षांपूर्वी या असोसिएशनची स्थापना झाली. आर्किटेक्ट आर. एस. बेरी यांच्यासारख्या नामवंत आर्किटेक्ट, इंजिनिअर्स यांनी या संस्थेच्या अध्यक्षपदी काम केले आहे. सकारात्मकता आणि यशस्वीपणे संस्थेची वाटचाल सुरू आहे. आतापर्यंत नॉमिनेशन कमिटी सादर करत असलेल्या अहवालानुसार वार्षिक सभेमध्ये मंजुरी घेऊन संचालक मंडळाची निवड करण्यात येत होती; परंतु यावर्षी संबंधित अहवाल नाकारल्याने असोसिएशनच्या ४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात सभासदांनी माझ्या पॅनेलवर विश्वास दाखविला आणि आम्हाला काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. सभासदांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी प्रयत्नशील राहणार आहोत.
प्रश्न : प्राधिकरण, डी क्लास बांधकामाच्या नियमावलीबाबत काय भूमिका असणार आहे?
उत्तर : आजपर्यंत कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली नसल्याने प्राधिकरणाचा प्रस्ताव पुढे आला. प्राधिकरणामध्ये समाविष्ट होणाºया गावांमध्ये शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून प्रबोधन करणे गरजेचे आहे. लोकभावनांचा आदर ठेवून लोकांचा विश्वास संपादित करणे गरजेचे आहे. त्याबाबत असोसिएशनची भूमिका नेहमी सकारात्मक राहील. संतुलित विकासासाठी प्राधिकरण आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ४२ गावांचा समावेश असलेल्या प्राधिकरणाची स्थापना एमआरटीपी अ‍ॅक्ट १९६६ चे कलम ४२ (ए) अन्वये दि. १६ आॅगस्ट २०१७ मध्ये झाली. लोकसंख्या, भौगोलिक स्थितीचा विचार करता मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर आणि पिंपरी-चिंचवड यांच्याशी कोल्हापूरची तुलना करणे चुकीचे आहे. डी-क्लास बांधकाम विकास नियमावलीत काही त्रुटी आहेत. त्या दूर होणे आवश्यक आहे. काही नियमांवर महापालिका स्तरावरून सकारात्मक प्रयत्न होणे आवश्यक आहे. सल्लागार, बांधकाम व्यावसायिकांनी वेळोवेळी असोसिएशनमार्फत आपली बाजू अभ्यासपूर्वक मांडली आहे. काही नियमांबाबत महानगरपालिका वरिष्ठ शासकीय स्तरावरून स्पष्टीकरण मागवत आहे. त्याची निर्गत लवकर व्हावी. त्यामुळे बरेच प्रकल्प दीर्घकाळापासून अडकून पडले आहेत. त्याचा परिणाम म्हणजे शहराचा विकास मंदावला आहे. त्याला गती आणि बळ देण्याच्या दृष्टीने प्राधिकरण, डी क्लास बांधकाम नियमावलीतील त्रुटी दूर करण्यासाठी असोसिएशन कार्यरत राहील.
प्रश्न : सभासदांना भेडसावणाºया विविध समस्यांची सोडवणूक कशी करणार?
उत्तर : सल्लागार परवाना, बांधकाम परवाना आदी विषयांच्या अनुषंगाने भेडसाविणाºया समस्या जाणून घेतल्या जातील. त्या विषयांबाबतचे असोसिएशनमधील अथवा बाहेरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन त्यातून अभ्यासपूर्वक, कायदेशीर आणि तंत्रशुद्ध मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जातील. महानगरपालिका प्रशासन, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पाठपुरावा करून सभासदांंचे हित जोपासले जाईल. महानगरपालिका प्रशासन आणि राज्य शासन यांच्याशी समन्वय साधून काम केले जाईल. प्रयत्न आणि पाठपुरावा करूनही समस्या, प्रश्नांची शासनाकडून सोडवणूक झाली नाही, तर विविध आंदोलनांच्या माध्यमातून लढा दिला जाईल.
प्रश्न : कोणते नवे उपक्रम सुरू केले जाणार आहेत?
उत्तर : असोसिएशनच्या नावलौकिकात भर घालणाºया सूचनांचा योग्य पद्धतीने विचार करण्यात येईल. संस्थेचे उत्पन्न वाढविण्यात येईल. त्यासाठी प्रदर्शनांचे आयोजन, सल्लागार अथवा सल्लागार समितीची नेमणूक, आदी केले जाईल. जागतिक बँकेच्या तांत्रिक शिक्षण दर्जा सुधारणा कार्यक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठामध्ये विविध चर्चासत्रे, प्रशिक्षण आणि कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे. विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागासमवेत सामंजस्य करार करण्यात येईल. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्टस, इन्स्टिट्यूट आॅफ इंटेरिअर डिझायनर, इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्स, व्हॅल्युअर आणि ‘क्रिडाई कोल्हापूर’, आदी संस्थांना सोबत घेऊन सभासद आणि असोसिएशनचे हित जोपासण्याचा प्रयत्न राहणार आहे. चांगले काम करणाºया आर्किटेक्टस, इंजिनिअर्स यांना प्रेरणा देण्यासाठी पुरस्कार सुरू केला जाणार आहे. रंकाळा तलाव आणि पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखणे, शहराची स्वच्छता आणि सौंदर्यीकरण, प्लास्टिकबंदी, आदींबाबत प्रबोधनपर सामाजिक उपक्रम राबविले जातील.

Web Title: Architect, engineers will strengthen the interests of the members of the community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.