शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलची एलबीटी वसुली साडेसात कोटींवर

By admin | Updated: May 4, 2015 00:35 IST

महापालिका : बुधवारपासून थकबाकीदार व्यापाऱ्यांवर जप्तीची कारवाई

सांगली : महापालिका आणि एलबीटीविरोधी कृती समितीच्या समझोत्यानंतरही व्यापाऱ्यांकडून एलबीटी वसुलीसाठी फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. एप्रिल महिन्यात केवळ ७ कोटी ६४ लाख रुपयांची एलबीटी वसूल झाल्याने महापालिकेची चिंता वाढली आहे. येत्या मंगळवारी साडेचारशे व्यापाऱ्यांच्या जप्तीपूर्व नोटिसांची मुदत संपल्याने बुधवारपासून जप्तीच्या कारवाईला सुरुवात होणार आहे. महापालिकेने थकित एलबीटीपोटी पाच दिवसांपूर्वी तीनशे व्यापाऱ्यांना जप्तीपूर्व नोटिसा बजाविल्या आहेत. या व्यापाऱ्यांकडे सुमारे ४३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यापूर्वी सुमारे साडेचारशे व्यापाऱ्यांना जप्तीपूर्व नोटिसा बजाविल्या होत्या. त्याची मुदत ४ एप्रिलला संपली आहे. महापालिका व व्यापाऱ्यांत एलबीटीप्रश्नी तोडगा निघाला होता. महापालिकेने व्याज व दंडाची आकारणी न करता चार हप्त्यामध्ये एलबीटी भरण्याची सवलत दिली होती. पण त्यालाही व्यापाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. विवरणपत्रे, तीन हप्त्याचे धनादेश व २०१३-१४ ची थकित एलबीटी भरण्याबाबत व्यापाऱ्यांकडून फारसा प्रतिसाद नाही. याप्रश्नी कृती समितीने घेतलेला पुढाकारही फारसा कामी आला नाही. त्यामुळे महापालिकेने आता कारवाईचे हत्यार उपसले आहे. यापूर्वी सुमारे साडेचारशे व्यापाऱ्यांना जप्तीपूर्व नोटिसांची मुदत यापूर्वीच संपली आहे, पण व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकली नाही. पाच दिवसांपूर्वी ज्या तीनशे व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या त्यांची मुदत १५ दिवसांची आहे. त्यांच्यावरही पुढील टप्प्यात कारवाईचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. महापालिकेने गेल्या दोन वर्षात व्यापाऱ्यांनी केलेल्या उलाढालीची माहिती जमा करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी व्हॅट व विक्रीकर विभागाशीही संपर्क साधला होता. पण मार्च एन्डमुळे या दोन्ही विभागांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शविली होती. आता या दोन्ही विभागांचे मार्च एन्डचे कामकाज पूर्ण झाले असून, त्यांनी व्यापाऱ्यांच्या उलाढालीची माहिती महापालिकेला सादर केली आहे. या माहितीची छाननी करून आणखी काही व्यापाऱ्यांना नोटिसा बजाविल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी) उरले केवळ तीन महिने थकित आणि चालू वर्षातील एलबीटी वसुलीसाठी महापालिकेकडे केवळ तीन महिन्यांचा अवधी उरला आहे. एप्रिलची वसुली साडेसात कोटींच्या घरात आहे. असाच प्रतिसाद राहिला, तर एलबीटी वसुलीचा आकडा तीस कोटींच्या घरातही जाणे मुश्किल आहे. असे झाले तर पुन्हा एलबीटी वसूल करणे मुश्किल होणार आहे. त्यामुळे महापालिकेची चिंता वाढली आहे.