रेमडेसिविरच्या सनियंत्रणासाठी तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:22 IST2021-04-13T04:22:28+5:302021-04-13T04:22:28+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील रेमडेसिविर इंजक्शनच्या सनियंत्रणाकरिता कोल्हापूर शहराकरिता महापालिका आरोग्य अधिकारी, ग्रामीण भागासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि नगरपालिका क्षेत्रासाठी ...

Appointment of three officers for monitoring of Remedesivir | रेमडेसिविरच्या सनियंत्रणासाठी तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

रेमडेसिविरच्या सनियंत्रणासाठी तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

कोल्हापूर : जिल्ह्यातील रेमडेसिविर इंजक्शनच्या सनियंत्रणाकरिता कोल्हापूर शहराकरिता महापालिका आरोग्य अधिकारी, ग्रामीण भागासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि नगरपालिका क्षेत्रासाठी जिल्हा शल्य चिकित्सक अशा तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी पत्रकाव्दारे ही माहिती दिली.

पत्रकात म्हटले आहे, कोरोनाच्या दैनंदिन रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असून रेमडेसिविरचा तुटवडा असल्याच्या तक्रारी येत आहेत. या औषधाची विक्री ही जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने फक्त कोविड रुग्णालये व कोविड रुग्णालयाशी संलग्न औषध विक्रेत्यांना करणे, शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या दरानेच विक्री करणे, जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन इतर रुग्णालयात दाखल रुग्णांना उपलब्ध होण्याच्या दृष्टिने अभ्यास करुन गरजेनुसार आवश्यक तिथे जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने निश्चित करणे व त्यांच्यामार्फत औषधांचा पुरवठा करणे याबाबत हे तीन अधिकारी निर्णय घेणार आहेत. इतर कोणत्याही विक्रेत्यांना कोरोना कालावधी संपेपर्यंत वितरण/ विक्री करण्यात येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार तसेच भारतीय दंड संहिता १८६० (४५) च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Appointment of three officers for monitoring of Remedesivir