शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

घरफाळा नोंदीसंबंधी हरकती करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:25 IST

कोल्हापूर : शहरातील खुल्या जागा व इमारतीवरील वार्षिक भांडवली मूल्य आकारणी, पुस्तकातील नोंदी, तक्रारी व हरकती असतील, तर त्या ...

कोल्हापूर : शहरातील खुल्या जागा व इमारतीवरील वार्षिक भांडवली मूल्य आकारणी, पुस्तकातील नोंदी, तक्रारी व हरकती असतील, तर त्या आजपासून दि. ५ मार्चअखेर सादर कराव्यात, असे आवाहन महापालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने एका पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

शहरातील सर्व मिळकतधारक, भोगवटाधारक अथवा वटमुखत्यार प्रतिनिधी संबंधितांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामधील तरतुदीनुसार मिळकतीत आवश्यक असलेल्या नोंदी पूर्ण करण्यात आलेली असेसमेंट बुके त्यात योग्य वाटतील असे फेरफार करून नवीन वर्षाच्या नोंदी म्हणून स्वीकारण्यात येणार आहेत. या मिळकत कर आकारणीची बुके नियम १४ प्रमाणे संबंधितांना पाहण्यासाठी व त्यातून उतारे घेण्यासाठी महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयाकडील कर आकारणी ऑफिसमध्ये ठेवण्यात आली आहेत.

ज्या खुल्या जागा व इमारतीवरील भांडवली मूल्याची रक्कम कर भरावयास पात्र असलेल्या इसमाचे नाव, कुळे गेली, नवीन कुळे आली किंवा कर आकारणी तक्त्यांमध्ये नाव, पत्ता अगर इतर फेरफार, दुरुस्ती वगैरेसाठी ज्या कोणास तक्रारी अगर हरकती सादर करावयाच्या असतील त्यांनी आजपासून दि. ५ मार्चपर्यंत लेखी अर्जासोबत सन २०२०-२०२१ अखेर घरफाळा भरलेल्या पावतीची छायांकित प्रत कागदपत्राच्या पुराव्यासह संबंधित नागरी सुविधा केंद्रामध्ये दाखल करून त्याची पोहोच घ्यावी, असेही पत्रकात म्हटले आहे.