‘गोकुळ’च्या सभेत सभासदांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:57 IST2021-02-05T06:57:30+5:302021-02-05T06:57:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची ...

Answer all the questions of the members in the meeting of ‘Gokul’ | ‘गोकुळ’च्या सभेत सभासदांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या

‘गोकुळ’च्या सभेत सभासदांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या, अशी सूचना संघाचे नेते आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी संचालकांनी केली.

सर्वसाधारण सभेची विरोधी गटाने जोरदार तयारी केली आहे, त्यात निवडणूक असल्याने सत्तारूढ गटाने संयमाने सभा हाताळण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात पी. एन. पाटील व महादेवराव महाडिक यांनी संचालकांची बैठक घेऊन सभेबाबत सूचना केल्या आणि सभेबाबत व्यूहरचना ठरविण्यात आली.

मागील सभेत सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे न देता सभा गुंडाळल्याचा आरोप झाला होता. मल्टिस्टेटला गोंधळातच मंजुरी घेतली खरी मात्र नंतर हा विषय मागे घ्यावा लागला. त्यामुळे या सभेत कोणत्याही प्रकारची गडबड न करता सभासदांनी विचारलेल्या उत्तरे द्या. सगळ्यांनी मिळून सभा हाताळा, आदी सूचना करत ऐनवेळी कोणते विषय घ्यायचे, यावरही बैठकीत चर्चा झाली. बैठकीला ज्येष्ठ संचालक अरुण नरके, विश्वास पाटील, रणजितसिंह पाटील, अरुण डोंगळे, विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, बाळासाहेब खाडे, सत्यजित पाटील, उदय पाटील आदी संचालक उपस्थित होते.

यूथ बँकेतील पैशांचा मुद्दा गाजणार

यूथ बँकेत ‘गोकुळ’चे पाच कोटी अडकले आहेत. बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध आल्याने गेली दोन वर्षे व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे या रकमेच्या व्याजाचे काय? असा प्रश्न विरोधकांनी विचारला आहे, त्याची चर्चाही बैठकीत झाली.

Web Title: Answer all the questions of the members in the meeting of ‘Gokul’