Kolhapur Crime: बनावट नोटाप्रकरणी उदगावच्या आणखी एकास अटक, आरोपीची संख्या झाली चार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 18:08 IST2025-11-06T18:07:53+5:302025-11-06T18:08:24+5:30
न्यायालयाने ७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली

Kolhapur Crime: बनावट नोटाप्रकरणी उदगावच्या आणखी एकास अटक, आरोपीची संख्या झाली चार
जयसिंगपूर : बनावट नोटा प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे. पोलिसांनी आणखी आरोपीस बुधवारी अटक केली. पंकज सुधीर आंबी (उदगाव, ता. शिरोळ) असे त्याचे नाव असून या गुन्ह्यात आरोपीची संख्या आता चार झाली आहे. न्यायालयाने त्याला ७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
बनावट नोटांच्या रॅकेटचा जयसिंगपूर उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने पर्दाफाश करून ६८ हजार ४०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. याप्रकरणी साहिल मुल्लाणी (रा. उदगाव, ता. शिरोळ), ओंकार तोवार (मूळगाव- इचलकरंजी, सध्या रा. दानोळी, ता. शिरोळ) व रमेश पाटील (रा. जुना चंदूर रोड, बरगे मळा, इचलकरंजी) या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. पोलिस तपासात उदगावच्या आंबीचे नाव पुढे आल्याने त्याला पोलिसांनी अटक केली.