Kolhapur-ZP Election: जिल्हा परिषदेसाठी १२ निवडणूक अधिकाऱ्यांची घोषणा, तालुकानिहाय अधिकारी..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 12:42 IST2026-01-14T12:37:24+5:302026-01-14T12:42:02+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची घोषणा मंगळवारी रात्री जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली ...

Kolhapur-ZP Election: जिल्हा परिषदेसाठी १२ निवडणूक अधिकाऱ्यांची घोषणा, तालुकानिहाय अधिकारी..जाणून घ्या
कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची घोषणा मंगळवारी रात्री जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली आहे. तसेच १२ सहायक निवडणूक निर्णय अधिकारीही नियुक्त करण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारी २०२६पर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याची राज्य निवडणूक आयोगाची विनंती मान्य केल्यानंतर आयोगाने मंगळवारी या निवडणुका जाहीर केल्या. त्याच दिवशी येडगे यांनी या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
अ. क्र. - निवडणूक निर्णय अधिकारी नाव व पदनाम - सहा. निवडणूक निर्णय अधिकारी नाव व पदनाम
१ शाहूवाडी : वर्षा शिंगण जिल्हा पुनर्वसन अधिकारी / सीमा सोनवणे तहसीलदार, शाहूवाडी
२ पन्हाळा : समीर शिंगटे उपविभागीय अधिकारी पन्हाळा शाहूवाडी / माधवी शिंदे तहसीलदार, पन्हाळा
३ हातकणंगले : दीपक शिंदे, उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी / सुशील बेल्हेकर, तहसीलदार हातकणंगले
४ शिरोळ : अर्चना नष्टे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन (क्र. ६) / अनिलकुमार हेळकर तहसीलदार, शिरोळ
५ कागल : प्रसाद चौगुले, उपविभागीय अधिकारी राधानगरी कागल / अमरदीप वाकडे तहसीलदार, कागल
६ राधानगरी : शक्ती कदम उपजिल्हाधिकारी (रो ह. यो.)/ अनिता देशमुख तहसीलदार, राधानगरी
७ करवीर : मोसमी चौगुले उपविभागीय अधिकारी करवीर / स्वप्नील पवार तहसीलदार, कोल्हापूर
८ गगनबावडा : मोहिनी चव्हाण जिल्हा पुरवठा अधिकारी / रुपाली सूर्यवंशी तहसीलदार, गगनबावडा
९ भुदरगड : हरेश सुळ उपविभागीय अधिकारी आजरा भुदरगड / अर्चना पाटील तहसीलदार, भुदरगड
१० आजरा : रुपाली चौगुले उपजिल्हाधिकारी भू संपादन (क्र. १२)/ समीर माने, तहसीलदार, आजरा
११ गडहिंग्लज : एकनाथ काळबांडे उपविभागीय अधिकारी / ऋषिकेश शेळके तहसीलदार, गडहिंग्लज
१२ चंदगड : बाबासाहेब वाघमोडे मुद्रांक जिल्हाधिकारी / राजेश चव्हाण तहसीलदार, चंदगड