संपाबाबत अद्याप तोडगा नाही; अंगणवाडी कर्मचारी येत्या मंगळवारी पुणे-बंगळूरु महामार्ग रोखणार 

By समीर देशपांडे | Published: January 19, 2024 04:18 PM2024-01-19T16:18:14+5:302024-01-19T16:18:54+5:30

कोल्हापूर : अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपाबाबत तोडगा निघत नसल्याने शासनाच्या निषेर्धात मंगळवारी (दि. २३) पुणे बंगळूर महामार्ग रोखण्यात येणार ...

Anganwadi workers will block the Pune Bangalore highway next Tuesday | संपाबाबत अद्याप तोडगा नाही; अंगणवाडी कर्मचारी येत्या मंगळवारी पुणे-बंगळूरु महामार्ग रोखणार 

संपाबाबत अद्याप तोडगा नाही; अंगणवाडी कर्मचारी येत्या मंगळवारी पुणे-बंगळूरु महामार्ग रोखणार 

कोल्हापूर: अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपाबाबत तोडगा निघत नसल्याने शासनाच्या निषेर्धात मंगळवारी (दि. २३) पुणे बंगळूर महामार्ग रोखण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. अध्यक्ष अतुल दिघे आणि सचिव सुवर्णा तळेकर यांनी ही माहिती दिली.

या कर्मचाऱ्यांचा ४ डिसेंबर २०२३ पासून संप सुरू आहे. या दरम्यान राज्यभरातील सर्व अंगणवाड्यांचे कामकाज ठप्प आहे. काही जिल्ह्यात या महिला कर्मचारी कामावर हजर होत आहेत. परंतू कोल्हापूर जिल्ह्यात संघटना दबाव टाकून सुरू केलेल्या अंगणवाड्या बंद पाडत आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिये फाटा ते कागल नाका या परिसरात राष्ट्रीय महामार्ग रोखणार आहेत.

‘मुंबईत बैठक लावते’ असे आश्वासन देवून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मुंबईला गेल्या आहेत. परंतू त्यांनी बैठक लावलेली नाही. याच्या निषेर्धात हा रास्ता रोको करण्यात येणार आहे.

Web Title: Anganwadi workers will block the Pune Bangalore highway next Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.