शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची कोल्हापूर  जिल्हा परिषदेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 11:49 IST

‘ एक रुपयाचा कडीपत्ता, सरकार झालंय बेपत्ता’ अशा घोषणा देत कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर आपला संताप व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देअंगणवाडी कर्मचाऱ्यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेवर धडकअंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने मोर्चाचे आयोजन

कोल्हापूर : ‘ एक रुपयाचा कडीपत्ता, सरकार झालंय बेपत्ता’ अशा घोषणा देत कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर आपला संताप व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.दुपारी साडेबारानंतर महावीर उद्यानाजवळून मोर्चाला सुरुवात झाली. ‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा देत अंगणवाडी सेविका, मदतनीस जिल्हा परिषदेवर मोर्चाने आल्या. यावेळी सर्वांनीच रस्त्यावर बसून घोषणा सुरू केल्याने, या ठिकाणी वाहतूक दुसरीकडून वळविण्यात आली.या ठिकाणी कॉ. आप्पा पाटील, जयश्री पाटील, सरिता कंदले, अर्चना पाटील यांची यावेळी भाषणे झाली. मोर्चानंतर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

आंदोलनामध्ये शिवाजीराव परुळेकर, बाळेश नाईक, अंजना शारबिद्रे, राजश्री बाबाणावर, सुरेखा गायकवाड, शांता कोरवी, वंदना साबळे यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या.अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या१ सर्व प्रकारच्या अनियमित कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा.२ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी माना, मानधनाऐवजी वेतन द्या.३ भाऊबीजेऐवजी बोनस द्या, सरकारी नोकर मानेपर्यंत १८ हजार किमान वेतन द्या.४ भविष्य निर्वाह निधी, कामगार विमा योजना यांसारख्या सामाजिक सुरक्षा योजना लागू करा.५ अंगणवाड्यांचे खाजगीकरण करू नका.६ केंद्र सरकारने २0 सप्टेंबर २0१८ अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केलेली मानधनवाढ फरकासह ताबडतोब द्या.७ सेवानिवृत्तीचे लाभ निवृत्तीदिवशीच द्या.८ अंगणवाडींसाठी इमारती मंजूर करा.९ टीएच आहार बंद करू, ताजा आहार देण्याची व्यवस्था करा.१0 वर्षाला १५ दिवस भरपगारी आजारपणाची रजा द्या. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर