शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

शिक्षक दिन विशेष: दुर्गम भागात विद्यार्थ्यांना शिक्षणाचा ‘आनंद’ देणारे नाळे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 2:24 PM

दुर्गम भागात बदलीची विनंती करत राधानगरीचे शेवटचे टोक पात्रेवाडी गाव निवडले

कोल्हापूर : दुर्गम भागात शिक्षणाची गंगोत्री पोहोचवण्याचे काम शासनाने केले असले तरी या ‘गंगोत्री’ने तेथील परिसर शैक्षणिकदृष्ट्या ‘सुजलाम सुफलाम’ झाला पाहिजे, या ध्येयाने गेली २७ वर्षे अक्षरश: झपाटल्यासारखे काम सांगरूळ (ता. करवीर) येथील आनंदराव दिनकर नाळे करत आहेत. राधानगरी तालुक्यातील पात्रेवाडी या दुर्गम शाळेचे रुपडे पालटण्याचा विडा त्यांनी उचलला असून, ही शाळा राज्यातील मॉडेल करण्यासाठी त्यांनी सुरू केलेली धडपड आजच्या शिक्षण व्यवस्थेसमोर आदर्शवत आहे.आनंदराव नाळे यांनी १९९६ ला डी. एड. झाल्यानंतर पन्हाळा तालुक्यातील पणुत्रे येथे सेवेला सुरुवात केली. येथील पालक गरीब शेतकरी, मजूर असल्याने येथील मुलांना शिक्षणाची गोडी लावण्याचे आव्हान नाळे यांनी पेलत पटसंख्या वाढवत शैक्षणिक दर्जा सुधारला. शाळेच्या भौतिक सुधारणांकडे लक्ष देत विद्युत रोषणाईसह बाग विकसित करत तरुण मंडळे, दानशूर व्यक्तींना सोबत घेऊन शाळेचे रुपडेच पालटले. हे करत असताना चार-चार महिने ते घरीच येत नव्हते. वर्षातून दोन वेळा शाळा धुऊन काढत. मल्लखांब, जिम्नॅस्टिकच्या माध्यमातून शाळेचे नाव राष्ट्रीय पातळीपर्यंत नेले. पडळ येथे बदली झाल्यानंतर शाळा मॉडेल करत शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध, विज्ञानप्रदर्शनच्या माध्यमातून जिल्हास्तरावर शाळेचा दबदबा निर्माण केला. २२ वर्षे दुर्गम भागात सेवा केल्यानंतर त्यांना शहराशेजारील शाळा मिळू शकली असती, पण दुर्गम भागात बदलीची विनंती करत राधानगरीचे शेवटचे टोक पात्रेवाडी गाव निवडले.

जेमतेम ३५ कुटुंबाचे गाव, त्यात शाळा अर्धा किलोमीटर लांब, त्यामुळे मुलांची उपस्थितीही जेमतेमच, नाळे यांनी प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन मुलांना शाळेत आणून त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली; पण पावसाळ्यात ओढ्याला पाणी आले की दीड-दोन महिने मुले यायची नाहीत. यासाठी गावकऱ्यांच्या सहकार्यातून त्यांनी ओढ्यावर लहान पूल उभारून रस्ता केला. शाळेभोवती संरक्षक भिंत, शाळेपर्यंत डांबरी रस्ता व कमान उभी करून शाळेचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात केली आहे. येथे बिनभिंतीची शाळा उभारण्याचा त्यांचा संकल्प आहे.बदलीसाठी ग्रामदैवताला साकडेनाळे यांनी सोळा वर्षे पणुत्रे शाळेत सेवा केल्यानंतर त्यांची बदली झाली, ती थांबवण्यासाठी शिक्षण विभागापर्यंत प्रयत्न झाले. शेवटी ग्रामदैवताला कौल लावून साकडे घातले, इतके प्रेम त्यांनी मिळवले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeachers Dayशिक्षक दिनTeacherशिक्षक