Crime News: पोलीस ओळखपत्राला भुलला, वृद्ध भरदिवसा गंडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 14:25 IST2022-06-20T14:18:00+5:302022-06-20T14:25:19+5:30
आजरा : पोलीस असल्याची बतावणी करून भादवण (ता. आजरा) येथील वृद्धास अज्ञात चोरट्यांनी लुटले. चोरट्यांनी वृद्धाकडून दोन तोळे सोन्याच्या ...

Crime News: पोलीस ओळखपत्राला भुलला, वृद्ध भरदिवसा गंडला
आजरा : पोलीस असल्याची बतावणी करून भादवण (ता. आजरा) येथील वृद्धास अज्ञात चोरट्यांनी लुटले. चोरट्यांनी वृद्धाकडून दोन तोळे सोन्याच्या अंगठ्या व रोख रक्कम लंपास केली आहे. ही घटना आज, सोमवार सकाळी ११.३० वा. सुमारास भादवण तिट्टयावर घडली.
चोरट्यांनी पोलिसांचे ओळखपत्रही दाखविले असल्याचे वृध्दांने पोलिसांना सांगितले. आजऱ्याकडे जाताना पुढे पोलीस असून ते तपासणी करीत आहेत. त्यामुळे हातातील अंगठ्या व पैसे आमच्याकडे द्या अशी बतावणी करुन मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी लुटले आहे. गेल्या अनेक वर्षांतील लूटमारीचा आजरा तालुक्यातील हा पहिलाच प्रसंग आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली.