कोल्हापूर/मुंबई : 'क्रीडा पंढरी' अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम निर्माण करण्यासाठी विकासवाडी (ता. करवीर) येथील १२ हेक्टर ७६ आर. (३२ एकर) शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या स्टेडियममुळे कोल्हापूरच्या क्रीडा विकासाला चालना मिळणार आहे.कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने यासाठी पाठपुरावा केला होता. विकासवाडीत महाराष्ट्र औद्योगिक मंडळाच्या ताब्यात असलेल्या ४२१ हेक्टर जमिनीपैकी १२ हेक्टर जमीन क्रीडा विभागाला उपलब्ध करून द्यावी, असे आदेश दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०२४ मध्ये दिले आहेत. त्यानुसार सध्या महसूल विभागाच्या ताब्यात असलेली १२ हेक्टर ७६ आर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
आंतरराष्ट्रीय सामने पाहण्याची संधीयापूर्वी ८० च्या दशकात कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सामना रंगला होता. त्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना कोल्हापुरात झालेला नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम नसल्याने कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आयोजित करण्यात येत नव्हते. त्यामुळे विकासवाडीत जागेसाठी पाठपुरावा सुरू होता त्याला अखेर यश आले आहे. हे स्टेडियम पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरकरांना आंतरराष्ट्रीय सामने पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.जिल्हा क्रिकेट असोसिएशन करणार स्टेडियमचा खर्च
- या स्टेडियमसाठी केवळ जमीन शासनाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागास भौगाधिकार मूल्यरहित व महसूलमुक्त (विनामूल्य) तसेच कब्जेहक्काने ही जमीन देण्यात येणार आहे.
- ही जमीन शालेय शिक्षण व क्रीडा विभागास प्राप्त झाल्यानंतर शासनाच्या नियम, तरतुदी व धोरणांचा विचार करून जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांना आवश्यकतेनुसार जागा उपलब्ध करून देण्यासाठी कराराची कार्यवाही करण्यात येणार आहे.
- स्टेडियम उभारण्यासाठी येणारा खर्च हा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन करणार आहे.
पाच जिल्ह्यांतील खेळाडूंना लाभया जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारल्यानंतर कोल्हापूरमह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उदयोन्मुख प्रतिभावान खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. तसेच क्रिकेटच्या नकाशावर कोल्हापूरची ओळख ठळक बनणार आहे.
हा निर्णय कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार असून, कोकण व परिचा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अनेक होतकरू क्रिकेटपटूना याचा मोठा लाभ होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूरमधील क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूनी पाहिलेले स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे - संभाजीराजे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन
कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे केलेल्या पाठपुराव्याला यश आले. लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य क्रिकेट स्टेडियम आकाराला येऊन कोल्हापूरच्या क्रीडापरंपरेला चालना मिळेल - अमल महाडिक, आमदार कोल्हापूर दक्षिण
कोल्हापुरात क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. याआधीच येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम होणे अपेक्षित होते. मात्र, आता ते स्वप्न पूर्ण होत असून, कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यांतील खेळाडूंना त्याचा मोठा लाभ होणार आहे. - नंदू बामणे, माजी क्रिकेटपटू कोल्हापूर
Web Summary : Kolhapur's Vikaswadi will house an international cricket stadium, boosting sports. The District Cricket Association will fund construction on land sanctioned by the state government. This offers opportunities for players across five districts.
Web Summary : कोल्हापुर के विकासवाड़ी में अंतर्राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बनेगा, जिससे खेल को बढ़ावा मिलेगा। जिला क्रिकेट संघ राज्य सरकार द्वारा स्वीकृत भूमि पर निर्माण का वित्तपोषण करेगा। इससे पांच जिलों के खिलाड़ियों को अवसर मिलेंगे।