Kolhapur: कृत्रिम अधिवासातून ‘गार्डन लिझार्ड’च्या पिल्लांचा जन्म, ‘बरणीत’ उबवली अंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 19:20 IST2025-10-04T19:18:39+5:302025-10-04T19:20:55+5:30
पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडूनही देण्यात आले

छाया-आदित्य वेल्हाळ
आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : बालिंगे (ता. करवीर) परिसरात सरड्याची अंडी उघड्यावर पडल्याचे फुलेवाडी येथील गणेश कदम यांना समजताच, त्यांनी ती घरी आणून शास्त्रोक्त कृत्रिम अधिवास तयार करून दिला आणि बारा दिवसानंतर ‘गार्डन लिझार्ड’च्या जातीच्या सरड्याच्या तब्बल तेरा पिल्लांनी जन्म घेतला.
देवेंद्र पार्कात नवीन घराचे काम सुरू असताना शुभम जाधव यांना अंडी उघड्यावर पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी गणेश कदम यांना संपर्क साधला. कदम यांनी तातडीने ती अंडी घरी आणून वाळू, कोको पावडर, लहान खडे एका प्लॅस्टिकच्या बरणीत घातले.
पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील पर्यावरण अभ्यासक पप्पू खोत यांच्याकडून माहीती घेऊन अंडी उबवण्यासाठी वातावरण त्यांनी बरणीत तयार केले. बुधवारी तेरा पिल्लांचा जन्म झाला आणि गुरुवारी त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडूनही देण्यात आले.